Hero Xtreme 160R (Photo Credits-Twitter)

Hero Xtreme 160R भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. Hero  Motocorp  यांनी ही बाईक दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध करुन दिली आहे. Hero Xtreme 160 फ्रंट डिस्कसह सिंगल चॅनल ABS वेरिटंची किंमत 99,950 रुपये आणि डबल डिस्कसह सिंगल चॅनल ABS ची किंमत 1,03,500 रुपये आहे. नव्या Xtreme 160R  मध्ये कंपनीने सर्व सेगमेंटपूर्वीचे फिचर्स सहभागी केले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम कंपनीने LED पॅकेज दिला आहे. त्याचसोबत फ्रंटला फुल LED हेडलॅम्पसह LED, DRLs, LED इंटीकेटर्सह हजार्ड स्विच आणि रियरमध्ये H सिग्नेचर LED हेडलॅम्प दिले आहेत. कंपनीने या बाईकमध्ये इन्वर्टेड फुल्ली डिजिटल LED डिस्प्लेसह सेगमेंटमधील साइड-स्टँड इंजिन कट ऑफ फिचर सुद्धा दिले आहे.

पॉवर स्पेसिफिकेशन बाबत बोलायचे झाल्यास Xtreme 160R कंपनीने एक 160cc एअर-कूल्ड BS6 इंजिन दिले आहे. जे Xsens टेक्नॉलॉजी आणि अॅडवान्स प्रोग्राम फ्यूल इंजेक्शनसह येणार आहे. इंजिनच्या आउटपुटसाठी  8500rpm वर 15 bhp ची पॉवर देणार असून ही 0 ते 60 kmph चा वेग अवघ्या 4.7 सेकंदात पकडणार आहे. या मोटरसायकलचे वजन 138.5 किलोग्रॅम आहे. कंपनीने यामध्ये पर्ल सिल्वर व्हाइट, वायब्रैंट ब्लू आणि स्पोर्ट्स रेड उपलब्ध करुन दिले आहेत. (BS6 Honda Garzia 125 स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत)

Hero MotoCorp  ते हेड ऑफ ग्लोबल प्रोडक्ट प्लानिंग, Malo Le Masson यांनी असे म्हटले आहे की, Hero Xtreme 160R एक वास्तविक हेड-टर्नर आहे. शहरातील धावपळ पाहता ही एक मॉर्डन स्ट्रीट पद्धतीची आहे. Hero  Motocorp   चे हेड, आफ्टर सेल्स अॅन्ड पार्ट्स, नवीन चौहान यांनी असे सांगितले की, जेव्हा हिरो वर्ल्ड 2020 च्या इव्हेंटमध्ये Xtreme 160R शोकेस करण्यात आली तेव्हापासून कमर्शियल लॉन्चिंगसाठी बहुतांश जणांनी विचारले आहे. या बाईक संदर्भात सुरुवाती पासूनच प्रतिक्रिया सकारात्मक आल्या आहेत.