BS6 Honda Garzia 125 स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत
BS6 Honda Garzia 125 Scooter (Photo Credits: Twitter)

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) यांनी BS6 Honda Grazia 125 लॉन्च केली आहे. ही स्कूटर ग्राहकांना दोन वेरियंटमध्ये म्हणजेच स्टँडर्ड आणि डिलक्स नुसार बाजारात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची किंमत क्रमश: 73,912 रुपये आणि 80,978 रुपये आहे. या किंमती दिल्लीतील एक्स शोरुमची आहे. नव्या होंडा गार्झिया मध्ये अपडेटेड इंजिनसह अन्य काही नवे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच स्कूटरच्या डिझाइनमध्ये हलका बदल सुद्धा करण्यात आला आहे.

होंडाने बीएस6 ग्रार्झिया स्कूटरची डिझाइनमध्ये थोडा बदल करत त्याला अधिक शार्प लूक देण्यात आला आहे. स्कूटरमध्ये LED DC हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यामध्ये Dio स्कूटरपासून प्रेरित LED DRL सुद्धा दिले आहेत. शार्प लाईन्स आणि एजसह हँडलबार काउलला नवे रुप दिले आहे. स्कूटरचे साईड बॉडी पॅनल्स ही शार्प दिसून येतात. स्कूटरचे टेल सेक्शन आणि ब्रेक-लाइटच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत. नवी ग्रार्झिया चार रंगात म्हणजेच मॅट सायबर यल्लो, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल सायरन ब्लू आणि मॅट एक्सिस ग्रे मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

हेदेखील वाचा- Honda कंपनीच्या 'या' दोन गाड्यांवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1 लाख रुपयांची सूट

होंडा कंपनीच्या अन्य स्कूटर्ससह बीएस6 ग्राझिया मध्ये लाईट स्विच आणि एक्सटर्नल फ्यूल-फिलर कॅप देण्यात आली आहे. तसेच अपडेटेड डिझेल इंस्ट्र्युमेंट कंसोल दिला आहे. त्याचा स्पीड आणि आरपीएम व्यतिरिक्त एवरेज मायलेज, रियल टाइम मायलेज, डिस्टेंस-टू- एम्पटी आणि 3 स्टेप ईको इंडिकेटर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच आणि इंजिन कट ऑफसह साइड स्टँड सारखे फिचर्स सुद्धा ग्राहकांना मिळणार आहेत.

कंपनीने असा दावा केला आहे की, ग्राझियात अंडर सीट स्टोरेज आणि ग्लव बॉक्स पुन्हा डिझाइन करण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना तेथे अधिक स्पेस मिळणार आहे, स्कूटर अलॉय वील्जसह 12 इंच फ्रंट आणि 10 इंच रियर टायरसह येणार आहे. ब्रेक बाबत बोलायचे झाल्यास अपडेटेड ग्राझियाच्या फ्रंटला 190mm डिस्क आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक दिले आहेत. स्कूटर CBS पेक्षा कमी आहे. तसेच नवे टेलेस्कोपिक सस्पेंशन दिला आहे.

2020 होंडा ग्राझिया मध्ये बीएस6 कम्प्लायंट 124cc, सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे. अपडेटेड इंजिन होंडा ईको टेक्नॉलॉजी (HET) आणि eSP सह येणार आहे. यामध्ये ACG सह सायलेंड स्टार्ट आणि आयडलिंग स्टॉप सिस्टम सुद्धा दिले आहे. इंजिन 8.14 hp ची पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करणार आहे. होंडा कंपनीने असा ही दावा केला आहे की, जुन्या वर्जनच्या तुलनेत या अपडेटेड इंजिनचे मायलेज 13 टक्के अधिक आहे.