Honda (Photo Credits-twitter)

Honda Cars इंडिया जून महिन्यात ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या काही खास गाड्यांच्या मॉडेल्सवर दमदार सूट देत आहेत. ग्राहकांना होंडा कंपनीची गाडी खरेदी केल्यास तब्बल 1 लाख रुपयांचा डिस्काउंट देत असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामध्ये Honda Amaze आणि Honda City यांचा समावेश आहे. खासकरुन Honda कंपनीच्या या गाड्यांवर ही ऑफर वेरियंट, ग्रेड आणि लोकेशन नुसार विविध असणार आहे. कंपनीची ही ऑफर येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार आहे. (Renault ने बंद केली दमदार लूक असणारी SUV, कंपनीने वेबसाईट्सवरुन सुद्धा हटवली)

कंपनी BS6 Amaze खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक शानदार संधी देत आहे. सबकॉम्पेक्ट सेडान 20 हजार रुपयांच्या अतिरिक्त एक्ससेंजसह 12 हजार रुपयांच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी एक्सटेंड वॉरंटी सुद्धा देत आहे. जर ग्राहकांना जुनी गाडी द्यायची नसल्यास कंपनी 8 हजार रुपयांची 3 वर्षांसाठी होंडा केअर मेन्टेनेंस प्रोग्राम 50 टक्के कमी किंमतीत देणार आहे.(Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकीच्या ऑल्टोचा नवीन विक्रम; सलग 16 वर्षे ठरली भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी कार)

होंडा कंपनीने जून महिन्यात BS6 City सेडानवर आकर्षित ऑफर सुद्धा देण्यात येणार आहे. ही गाडी जुन्या जनरेशन मॉडेलचीच आहे पण कंपनी नव्या जनरेश मॉडेलसह विक्री करत आहे. इच्छुक ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सजेंच बेनिफिट्ससह 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंटचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. तसेच ZT मॅन्युअलसह CVT (VX आणि ZX) वेरियंट्सच्या प्रत्येक मॉडेलवर 50 हजार रुपयांपर्यंत एक्ससेंजचा लाभ आणि कॅश डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला VX मॅन्युअल वेरियंटवर कंपनीकडून 35 हजार रुपयांपर्यंत कार एक्सचेंज डिस्काउंटसह 37 हजार रुपायांचा कॅश लाभ सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.