WHO | (File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचे जगावर असलेले संकट अद्यापही संपले नाही. तोवर आणखी एक नवे आव्हान जगासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. पश्चिम अफ्रीकी (West Africa) देश गिणीमध्ये अत्यंत घातक अशा मारबर्ग विषाणू संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) नेही या विषाणूची पुष्टी केली आहे. हा विषाणू इबोला (Ebola) आणि कोरोना आदीपेक्षाही भयावह म्हणून ओळखला जातो. हा विषाणून जनावराच्या माध्यमातून मानवामध्ये संक्रमित होतो असे सांगीतले जात आहे.

मारबर्ग व्हायरस (Marburg Virus) संसर्ग होऊन पश्चिम गुएकेडौ प्रदेशातील एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातवारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस वटवागळाच्या माध्यमातून पसरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण 88% आहे. अफ्रीकेचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक निदेशक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी म्हटले आहे की, मारबर्ग व्हायरस लवकरच जगभरातील इतर देशांमध्ये पसरण्याची भीती आहे. त्यामुळे विषाणू संसर्ग वाढण्यापूर्वीच त्याला पायबंध घालणे आवश्यक आहे. (हेही वाचा, COVID-19 Delta Variant: जगभरात 96 देशांमध्ये सापडला डेल्टा व्हेरीएंट, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती)

जागतिक आरोग्य संघटनेद्वारा गिनी येथून इबोलाची दुसरी लाट संपल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात या नव्या विषाणूबाबत माहिती पुढे आली आहे. हा विषाणू पाठिमागील वर्षापासून कार्यरत झाला आहे. यात आतापर्यंत 12 नागरिकांचा जीव गेल्याचे वृत्त आहे. डब्लुएचओने जिनीवा येथे सांगितले की, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर या विषाणूचा धोका सर्वाधिक आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर या विषाणूचा धोका अद्याप तरी जाणवत नाही.

WHO ने म्हटले आहे की, मारबर्ग व्हायरस हा साधारणपणे रौसेटस वटवागूळाच्या गुहेत आढळतो. डब्लूएचओच्या माहितीनुसार, याचे संक्रमण संक्रमित लोकांच्या सानिध्यात आल्याने, दुषीत आहार आणि इतर साहित्य वापरल्याने होतो. आरोग्य विभागाने असा विषाणू आढळल्याच्या काही अवधितच संबंधित परिसरात नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे.