जगातिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) AstraZeneca च्या कोविड 19 लसीला थांबवण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान काही देशांनी अॅस्ट्राझेनेकाच्या कोविड 19 लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आशिया आणि युरोपियन देशांनी अॅस्ट्राझेनेकाची लस थांबवली होती. पण काल (12 मार्च) WHO ने माहिती देताना लसीच्या अॅडव्हायझरी कमिटीचा अहवाल तपासला जात आहे. सेफ्टी डाटा देखील पाहिला आहे. यामध्ये अॅस्ट्राझेनेका व्हॅक्सिन आणि क्लॉटिंग यांचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही समस्या असेल तर त्याचा देखील तपास केला जाईल असे WHO spokeswoman Margaret Harris यांनी स्पष्ट केले आहे.
स्पेन मध्ये 5 भागांत AstraZeneca vaccines सस्पेंड करण्यात आली आहे. ऑस्ट्रिया मध्ये देखील खबरदारीचा उपाय म्हणून संशयित बॅच थांबवण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये अॅस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे. कॅनडा मध्ये देखील लसीच्या दुष्परिणामाचे कोणतेही पुरावे समोर आले नसल्याने लसीचा वापर सुरू ठेवला जाणार आहे. थायलंड, आईसलॅन्ड, डेन्मार्क, नॉर्वे, रोमानिया या देशांमध्ये मात्र कोविड 19 लसीकरणामध्ये अॅस्ट्राझेनेकाची लस थांबवण्यात आली आहे. Oxford-AstraZeneca च्या कोरोना लसीच्या वापरावर 9 देशांकडून बंदी, ब्लड क्लॉटिंगच्या तक्रारीमुळे केली कारवाई.
दरम्यान WHO ने काल दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीच्या लसीला देखील आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे जगभरात कोविड 19 विरूद्धच्या लसीकरण मोहिमेला वेग येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतात देखील लस निर्मितीचं काम जोमाने सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत भारत 1 बिलियन कोविड 19 लसीची निर्मिती करू शकणार आहे. यामध्ये भारताला अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाची साथ मिळणार आहे.