जगभरामध्ये नववर्ष 2020 चे जल्लोषात (New Year 2020 Celebrations) स्वागत करण्यास सुरुवात झाली आहे. तर भारतातही नववर्षाच्या स्वागतासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. न्यूझीलंड (New Zealand) , ऑस्ट्रेलिया (Australia) आदी देशांमध्ये नववर्षाचे स्वागत झाले असून, या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी आणि इमारतींना विद्युत रोषानाई केल्याने आसमंत उजळून निघाला आहे. भारताच्या तुलनेत न्यूझिलंड मधील ऑकलॅन्ड (Auckland) शहराची वेळ भारतापेक्षा सुमरे साडेसात तासांनी पुढे आहे. त्यामुळे या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतातही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक अतूर झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी विविध पार्ट्यांचे आयोजन केले आहे. अनेक पब आणि हॉटेल्समध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, तिरूअनंतपुरम, हैदराबाद, लखनौ, पाटना यांसारख्या शहरांतही खास तयारी करण्यात आली आहे.
एएनआय ट्विट
#WATCH New Zealand: #NewYear celebrated in Auckland; visuals from Sky Tower. pic.twitter.com/8EMqdYBwyz
— ANI (@ANI) December 31, 2019
देशातील विविध ठिकाणचे समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळं आदी ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. अशा या आनंदाच्या ठिकाणी कोणता अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. (हेही वाचा, Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा नव्या वर्षाचा पहिला दिवस!)
एएनआय ट्विट
#WATCH Australia: Sydney rings in the New Year; celebrations at Sydney Harbour. pic.twitter.com/2TeXZjQyT6
— ANI (@ANI) December 31, 2019
दरम्यान, न्यूझीलंड सोबतच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथेही नववर्षाच्या स्वागतास सुरुवात झाली असून, सिडनी हार्बर येथे फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाईने आसमंत उजळून निघाला आहे. नववर्षासाचे स्वागत करताना लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोक नववर्षाच्यास्वागतासाठी आनंदाने तल्लीन झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.