भारतामधून उच्च शिक्षितांचा आता परदेशामध्ये जाऊन स्थायिक होण्याकडे कल वाढला आहे. पण अशातच सध्या जगभरामध्ये Layoffs Season देखील सुरू आहे. त्यामुळे नोकरीवरून टाकलेल्यांना काही पर्याय उपलब्ध रहावे यासाठी अमेरिकेमध्ये (USA) महत्त्वाचे व्हिसा नियमांमध्ये (Visa Rule) बदल झाले आहेत. नव्या व्हिसा नियमांनुसार आता अमेरिकेमध्ये बिझनेस किंवा टुरिस्ट अर्थात B-1, B-2 व्हिसावर देखील नव्या जॉब साठी अर्ज करण्याची, मुलाखती देण्याची संधी उमेदवारांकडे असणार आहे असे फेडरल एजंसी कडून बुधवारी सांगण्यात आले आहे. पण यामध्ये नोकरी देणार्यांना तुमची त्यांच्याकडे नोकरी सुरू होण्यापूर्वी व्हिसा स्टेट्स बदलावे लागणार आहे.
US Citizenship and Immigration Services (USCIS)कडून करण्यात आलेल्या काही ट्वीट्सच्या मध्ये नव्या व्हिसा नियमांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नॉन इमिग्रंट वर्कर्सना कामावरून काढून टाकलं तर त्यांच्याकडे पर्याय काय याची माहिती नसते. अनेकांचा असा समज असतो की त्यांना 60 दिवसात देश सोडून द्यावा लागेल. नक्की वाचा: American Visa Appointments च्या प्रतिक्षेमध्ये असणार्या भारतीयांना आता परदेशातही US Embassies मध्ये करता येणार अर्ज .
#USCISAnswers: Many people have asked if they can look for a new job while in B-1 or B-2 status. The answer is, yes. Searching for employment and interviewing for a position are permissible B-1 or B-2 activities.
Learn more: https://t.co/zFEneq28L9⬇️
— USCIS (@USCIS) March 22, 2023
दरम्यान कमाल 60 दिवसांची मर्यादा ही व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर म्हणजेच त्याच्या काम करण्याच्या शेवटच्या दिवसापासून सुरू होते. जेव्हा नॉन इमिग्रंट स्वतःहून नोकरी सोडतात किंवा त्यांना काढलं जातं तेव्हा इतर पर्याय पाहतात. अमेरिकेत ते त्यांच्या पात्र काळापर्यंत राहू शकतात. त्यासाठी त्यांना व्हिसा स्टेटस अपडेट करून घ्यावं लागेल, व्हिसाचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज करु शकतो. यासाठी तो परिस्थितीचा हवाला देऊन इंप्लॉयमेंट ऑथरायजेशन डॉक्यूमेंटसाठी अर्ज करु शकतो. जर ती प्रक्रिया पूर्ण केली तर 60 दिवसांच्या वाढीव कालावधीत नॉन-इमिग्रंटचा युनायटेड स्टेट्समध्ये अधिकृत राहण्याचा कालावधी 60 दिवसांपेक्षा जास्त असू शकतो, जरी त्यांनी त्यांचा पूर्वीचा नॉन-इमिग्रंट दर्जा गमावला तरीही त्यांना अमेरिकेत राहण्याचा पर्याय आहे असे USCIS ने ट्वीट मध्ये म्हटले आहे.
नोकरदाराने ग्रेस पिरिएड मध्ये योग्य पावलं उचलली नाही तर त्यांना, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना अमेरिका 60 दिवसांत किंवा राहण्याची मुभा असलेल्या कालावधी पैकी जे उपलब्ध आहे त्यापैकी एक मार्ग निवडावा लागेल.
B-1 किंवा B-2 वरही नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो पण नोकरी मिळाल्यास ती सुरू होण्यापूर्वी हा दर्जा B-1 किंवा B-2 वरून employment-authorized status करून घ्यावा लागेल. तो नाकारला गेल्यास किंवा प्रलंबित राहिल्यास अमेरिका सोडावी लागेल.