![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/onijah-andrew-robinson.jpg?width=380&height=214)
प्रेम ही जगातील एकमेव नितांतसुंदर आणि तितकीच निर्भेळ भावना. कदाचित म्हणूनच प्रेमास स्थळ, काळ, वेळ आणि सीमांचे बंधन मान्य नसावे. म्हणूनच लोक सातासमुद्रापार, डोंरगपर्वत पार करुन देशोदेशीचा प्रवास करत असावेत. अमेरिकेतील एक 33 वर्षीय ओनिजा अँड्र्यू रॉबिन्सन नामक महिला तिच्या कथीत प्रियकरास भेटण्यासाठी चक्क पाकिस्तानला आली. धक्कादायक म्हणजे तिचा कथीत प्रियकर तिला ऑनलाईन माध्यमातून भेटला आणि तो केवळ 19 वर्षांचा आहे. महिलेनेच दिलेल्या माहितीनुसार निदाल अहमद मेमन असे त्याचे नाव आहे. त्याच्यासाठी ती न्यू यॉर्क येथून कराची शहरात दाखल झाली खरी. पण, जेव्हा ती पाकिस्तानत आली तेव्हा मात्र निदाल याच्या कुटुंबीयांनी कानावर हात ठेवले. त्यातच तिचा व्हिसाही संपला आणि ती पाकिस्तानमध्येच अडकली. ज्यामुळे तिला भयंकर मानसिक धक्का बसला आणि ती अडचणीतही आली.
ऑनलाईन प्रेमातून विवाहाचा निर्णय, कुटुंबीयांमुळे स्वप्नभंग
दोन मुलांची आई असलेल्या रॉबिन्सनने ऑनलाइन संवादांद्वारे मेमनशी संबंध निर्माण झाले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात ऑनलाईनच इतके डुंबले की, त्यांनी चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे दोघांनीही एकमेकांना केव्हाही प्रत्यक्ष पहिले नव्हते. तरी दखील त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. हे प्रकरण इतके वाढले की, मेनन याच्या कथीत प्रेमावर विश्वास ठेवून तिने पाकिस्तानला जाऊन त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तथापि, मेमनच्या कुटुंबाने लग्नाला नकार दिल्याने आणि तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडल्याने तिचे स्वप्न भंगले. (हेही वाचा, Pakistan Shocker: 13 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याप्रकरणी 70 वर्षीय वृद्धाला अटक; पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील घटना)
प्रियकराच्या बंद घराबाहेर मुक्काम
रॉबिन्सन ही पाकिस्तानात गेली. मात्र, तिथे मेनन याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. त्यातच तिचा व्हिसाही कालबाह्य झाला. परिणामी तीस पाकिस्तानमध्ये कोणताही आधार राहिला नाही. परिणामी कराची येथील मेनन याच्या कुटुंबाच्या बंद असलेल्या घराबाहेर ती तळ ठोकून बसली. पाकिस्तानी कार्यकर्ते आणि युट्यूबर जफर अब्बास यांच्या ती निदर्शनास पडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तिची स्थिती शेअर केली आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले. (हेही वाचा, Pakistan Crime: तिसऱ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली म्हणून पाकिस्तानात सख्ख्या भावांकडून बहिणीची हत्या)
महिलेच्या मागण्या काय?
दरम्यान, या प्रकरणाची ऑनलाईन चर्चा झाल्यानंतर सिंधचे राज्यपाल कामरान खान टेसोरी यांनी रॉबिन्सनला व्हिसाच्या समस्यांमध्ये मदत केली आणि अमेरिकेला परतण्याचे तिकीट दिले. तथापि, तिने परत जाण्यास नकार दिला. त्याऐवजी असामान्य मागण्यांची मालिका सुरू केली. रॉबिन्सनने तिच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या आणि धक्कादायक मागण्या केल्या, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होता:
- मेमनकडून दर आठवड्याला $3,000 मिळावेत.
- पाकिस्तानी नागरिकत्व भेटावे.
- पाकिस्तानी सरकारकडून $100,000, आणि $20,000 रोख आगाऊ रक्कम मिळावी.
- पैशांच्या उद्देशाबद्दल विचारले असता, तिने उत्तर म्हटले की, 'तुम्हाला माझा व्यवसाय सांगणे माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे.' तिच्या विचित्र मागण्या आणि असंबंध विधाने यांमुळे तिच्या मानसिक आरोग्याबद्दलच शंका निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यामुळे प्रकरण उजेडात
View this post on Instagram
महिलेचे म्हणने काय?
View this post on Instagram
रॉबिन्सनचा मुलगा, जेरेमिया अँड्र्यू रॉबिन्सन, याने प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्याची आई बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. त्याने सांगितले की त्याने आणि त्याच्या भावंडाने तिला अमेरिकेत परतण्याची विनंती केली होती, परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. या खुलाशांनंतर, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रॉबिन्सनला मानसिक आरोग्य तपासणीसाठी कराचीच्या जिना पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्पिटलमधील मानसोपचार विभागात दाखल केले. द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, महिन्यांच्या वादानंतर, रॉबिन्सन अखेर अमेरिकेत परतण्यास तयार झाली आहे.