दक्षिण डेन्मार्क (Denmark) येथील सिलथोलम येथील एका खोदकामात पुराततत्व विभागास एक च्युइंग गम (Chewing Gum) सापडला आहे. हा च्युइंग गम पाहून पुराततत्व विभागाचे अधिकारी आणि संशोधकही आश्चर्यचकीत झाले आहेत. संशोधकांनी दावा केला आहे की, हा च्युइंग गम चक्क 5700 वर्षे इताक जुना आहे. विशेष म्हणजे या च्युइंग गममुळे संशोधकांना पाषाण युगातील एका महिलेच्या डीएनएचाही शोध लागल्याचे म्हटले आहे. पाषाण युग (Stone Age) काळातील डीएनए (DNA) सापडल्याने वैज्ञानिकही खूश झाले आहेत. हे संशोधन कोपेनहेगन विद्यापीठातील (University of Copenhagen ) संशोधकांनी हे संशोधन केले.
इतका जुना-पूराना च्युइंग गम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. संशोधकांना च्युइंग गम सोबत काही मानवी हाडे मिळाली आहेत. या हाडांमुळे पाषाण युगातील एका महिलेच्या डीएनएचाही शोध लागला आहे. हे संशोधन कोपेनहेगन विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले. या संशोधनानुसार हा च्युइंग गम ज्या महिलेने चगळला त्या महिलेचे डोक्याचे केस आणि त्वचा काळी होती. तर, डोळे निळे होते. संशोधकांनी या महिलेचे नाव लोला असे ठेवले आहे.
संशोधकांनी म्हटले आहे की, लोला जिथे राहात होती तिथले लोक प्रामुख्याने मासे पकडण्याचे काम करत असत. उपजीविका चालवण्यासाठी हे लोक पूर्णपणे शिकारीवर अवलंबून असत. स्थानिक जर्नल नेचर कम्युनिन्स च्या बुधवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Sex power वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सँड बोआ या सापाविषयी तुम्हाला माहिती आहे का? घ्या जाणून)
संशोधकांनी म्हटले आहे की, भोजपत्र नावाच्या झाडाच्या चिकाचे नमुने पाषाण युगातील मानवाचा आहार आणि त्यांच्या तोंडातील कीटानू यांच्याबातीतही शोध लागला आहे. हा शोध मानवी इतिहासाला वैज्ञानकदृष्ट्या प्रगल्प बनविण्यासाठी महत्त्वाची मदक करु शकतो. हजारो वर्षांनंतर कीटाणू आणि मानव यांचे आयुष्य आणि भविष्य कसे बदलत जाते याचाही अभ्यास या च्युइंग गम आणि डिएनएमुळे करता येईल असे संशोधकांनी म्हटले आहे.