Hafiz Saeed (Photo Credit: ANI)

संपूर्ण भारतासह जगाला हादरवून टाकणाऱ्या 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (26/11 Mumbai Attacks) सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed In Custody ) सध्या पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यात आहे. तो सध्या 78 वर्षांचा असून 12 फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगवासाची शिक्षा भोगत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) अधिकृतपणे सांगितले आहे. सुरक्षा परिषदेच्या समितीने (UN Security Council Committee) गेल्या महिन्यात दाएश आणि आयएसआयएलला (Da'esh and ISIL) लक्ष्य करून प्रवास बंदी, शस्त्रास्त्र निर्बंध आणि मालमत्ता गोठवण्याच्या अधीन असलेल्या लोक आणि संघटनांच्या यादीतील काही नावांमध्ये सुधारणा केली.

यूएनकडून यादी प्रसिद्ध

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने अद्ययावत केलेल्या यादीनुसार, लष्कर-ए-तय्यबा (LeT) आणि अल-कायदाशी संबंधित हाफिज सईदची याचा दहशतवादी संस्थां, संघटनांच्या समर्थनार्थ आर्थिक, नियोजन, सुविधा, तयारी, किंवा कृती घडवून आणण्यात सहभाग होता, असे पुढे आले आहे. त्याबाबात माहिती देणारा एक अहवाल 9 मार्च 2009 रोजी उपलब्ध करून देण्यात आला आणि 19 डिसेंबर 2023 रोजी अद्ययावत करण्यात आला. यूएननहे ही यादी 10 डिसेंबर 2008 रोजी प्रसिद्ध केली आहे. (हेही वाचा, Hafiz Saeed ला पाकिस्तान मध्ये Anti Terrorism Court कडून दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी 10 वर्ष तुरूंगावासाची शिक्षा)

हाफिज सईद उभारायचा दहशतवादी संघटनांसाठी निधी

लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा नेता आणि प्रमुख हाफिज सईद याने दहशतवादी संघटनेच्या ऑपरेशनल आणि निधी उभारणीच्या कृतींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 2000 च्या दशकापासून यूएन आणि ईयूने दहशतवादी म्हणून नियुक्त केले असूनही, सईदला कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यासाठी सुमारे दोन दशके लागली. एप्रिल 2022 मध्ये, लाहोरमधील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला "दहशतवादाला वित्तपुरवठा" केल्याबद्दल 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 17 जुलै 2019 पासून तो कोठडीत आहे. (हेही वाचा, Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी)

सईदच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून पाकिस्तानला पत्र

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पाकिस्तानला अलीकडेच हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून विनंती करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार अस्तित्वात नसला तरी, भारताने सईदच्या प्रत्यार्पणासाठी एका विशिष्ट प्रकरणात खटल्याला सामोरे जाण्यासाठी संबंधित सहाय्यक कागदपत्रांसह विनंती पाकिस्तानला कळवली आहे.

अवघ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेत, 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईत समुद्रमार्गे 26 नोव्हेंबर 2008 रोजी घुसखोरी केली आणि शहरातील अनेक ठिकाणी हल्ले केले. पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ने केलेल्या अंदाधुंद हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेमुळे देशविदेशातील निष्पाप नागरिकांचे आणि भारतीय पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचेही हाकनाक प्राण गेले.