मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड समजला जाणारा हाफिज सईद (Hafiz Saeed) याला पाकिस्तान कोर्टाने 10 वर्ष सहा महिन्यांच्या कारावारासी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने आज ANI ने केलेल्या ट्वीटनुसार, दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी(Illegal Funding Case) मध्ये पाकिस्तानात आज anti-terrorism courtने सुनावणी करत ही शिक्षा सुनावणी आहे. तर PTI च्या वृत्तानुसार, JuD chief Hafiz Saeed वरील 2 टेरर केस मध्ये आज सुनावणी करून शिक्षेची सुनावणी करण्यात आली आहे.
हाफिज सईदला कारावासाची शिक्षा सुनावण्याची ही पहिली वेळ नव्हे. फेब्रुवारी 2020 मध्ये देखील लष्कर ए तोयबा च्या फ्रंट ऑर्गनायझेशन Jamaat-ud-Dawa चा म्होरक्या हाफिज सईद ला आणि त्याच्या सहकार्यांना terror-financing case म्हणजेच दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक सहाय्य करण्याच्या बाबतीत 11 वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, मसूद अजहर यांच्यावर प्रतिबंद; FATF 'ग्रे लिस्ट' मधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड.
ANI Tweet
An anti-terrorism court in Pakistan sentences Jamat-ud-Dawa head Hafiz Saeed to 10-year imprisonment in an illegal funding case: Pakistan media
(file pic) pic.twitter.com/98Gf0Cn8si
— ANI (@ANI) November 19, 2020
दरम्यान भारताला हाफिज सईद हा 2008 साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी ताब्यात हवा आहे. त्या हल्ल्यामध्ये 10 दहशतवादी आणि 166 निष्पाप जीव मारले गेले होते तर शेकडो लोकं जखमी होते. हाफिज सईद हा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र यांच्याकडून ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच्यासाठी $10 million चं बक्षीस देखील घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये विविध अॅन्टी टेरिरिझम कोर्टामध्ये हाफिज सईद वर 41 विविध केसेस दाखल आहेत.