Brexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे
File image of UK Prime Minister Theresa May (Photo Credits: PTI)

Brexit Draft : युरोपियन समुदयामधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या नागरिकांनी सार्वमतांनी बहुमत दिले आहे. लवकरच अस्तित्त्वात येणार्‍या या निर्णयानंतर ब्रेक्झिट (Brexit) साठी युरोपीय समुदयासोबत केलेल्या करारामध्ये काही तरतुदी आणि अटींवरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (Theresa May) यांच्यासमोरील अडचणी वाढायला सुरूवात झाली आहे.

ब्रेक्झिटच्या मसुदा(Brexit Draft) करारावरून सध्या ब्रिटनचं राजकारण ढवळून निघालं आहे. थेरेसा मे यांचा करार अपरिपक्व असल्याचा आरोप करत ब्रेक्झिटचे सेक्रेटरी आणि परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब (Dominic Raab) आणि भारतीय वंशाचे मंत्री शैलेंद्र वारा यांच्यासह काही मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. ब्रिटिश कॅबिनेटमध्ये ब्रेक्झिटवर चर्चा झाल्यानंतर थेरेसा मे यांच्या पक्षातीलच काही सदस्यांनी राजीनामा दिल्याने थेरेसा मे विरुद्ध अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागण्याची रंगायला सुरूवात झाली आहे.

डॉमनिक राब (Dominic Raab) यांनी बेक्झिट कराराचा मसुदा तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असूनही राजीनामा दिल्याने तो एक मोठा धक्का समजला जात आहे.

ब्रिटन जर युरोपीय समुदायातून बाहेर पडला तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जात आहे. ब्रेक्झिटच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी युरोपीय युनियननं बैठक बोलावली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.