Representational Picture. Credits: Unsplash

पॅसिफिक महासागरात (Pacific Ocean) भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के बसल्यानंतर वानुआतुच्या (दक्षिण-पश्चिम प्रशांत महासागरातील 13 प्रमुख आणि अनेक लहान बेटांची दुहेरी साखळी) अडचणी वाढल्या आहेत. या ठिकाणी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे त्सुनामीची स्थिती निर्माण झाली आहे. वानुआतुच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने लोकांना उंच जमिनीवर जाण्याचा सल्ला दिला आहे. त्सुनामीच्या लाटा तीव्र होऊ शकतात असा त्यांचा विश्वास आहे. भूकंपामुळे आसपासचे बेट आणि महाद्वीपीय भागात सुनामीचा धोका वाढला आहे, ज्यासाठी स्थानिक सरकारने देखील अलर्ट जारी केला आहे.

पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्र (PTWC) नुसार, त्सुनामी लाटा या क्षणी कमी प्रभावी होत्या. बंदराजवळील शहरात 1.5 फुटांपेक्षा कमी लाटा मोजल्या गेल्या. मात्र त्सुनामीच्या लाटा तीव्र होऊ शकतात, असा विश्वास न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने व्यक्त केला आहे. फिजी, किरिबाटी, पापुआ न्यू गिनी, ग्वामसह इतर पॅसिफिक बेटांवर त्सुनामीच्या छोट्या लाटा येण्याची अपेक्षा होती. आता या ठिकाणांनाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने दक्षिण पॅसिफिक क्षेत्रातील देशांसाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनिया प्रांतातील लॉयल्टी बेटाच्या आग्नेय दिशेला 7.7 रिश्टर स्केलचे जोरदार हादरे जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून अंदाजे 37 किमी (23 मैल) खाली होता. आता वानुआतू, फिजी आणि न्यू कॅलेडोनियासाठी त्सुनामीचा संभाव्य धोका जारी करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र ब्युरोने सांगितले की, त्याच्या पूर्व किनाऱ्यावरील लॉर्ड हो बेटाला मोठा धोका असू शकतो. (हेही वाचा: Fishing Boat Capsizes: हिंद महासागरात उलटली चिनी मच्छिमारांची बोट, 39 जण बेपत्ता)

दरम्यान, या शक्तिशाली भूकंपाच्या काही तासांपूर्वी बुधवारी रात्री उशिरा मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी होती. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कॅनिलाजवळ आणि जमिनीपासून 158 मैल खोलीवर होता. कॅनिला राजधानी ग्वाटेमाला शहराच्या उत्तरेस सुमारे 120 मैलांवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 6 फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाने मोठी हानी केली होती. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दक्षिण तुर्कस्तानमधील गझियानटेप हे भूकंपाचे केंद्र होते.