थेरेसा मे यांचा Brexit करार ब्रिटन संसदेत अमान्य
UK Prime Minister Theresa May (File Photo)

Brexit Draft: ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा मे (Theresa May) यांनी मांडलेला ब्रेक्झिट (Brexit) करार खासदारांनी अमान्य केला आहे. यावर मंगळवारी ब्रिटन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मतदान घेण्यात आले. मात्र यावर केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूने मतं दिले. तर कराराला विरोध करणाऱ्या खासदारांची संख्या 423 आहे.

 गेल्या अडीच वर्षांपासून ब्रेक्झिट करारावरुन ब्रिटनचं राजकारण ढवळून निघालं आहे. यापूर्वीच ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियन सोडण्याचे निश्चित केले होते. यासाठी त्यांना 29 मार्च 2019 पर्यंतची मुदत देली होती. मात्र ब्रेक्झिट करार ब्रिटिश संसदेत अमान्य झाला. यापूर्वीही पंतप्रधान थेरेसा मे यांना करारावरुन धक्के बसले होते.

थेरेसा मे यांचा करार अपरिपक्व असल्याचा आरोप करत ब्रेक्झिटचे सेक्रेटरी आणि परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब (Dominic Raab) आणि भारतीय वंशाचे मंत्री शैलेंद्र वारा यांच्यासह काही मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.

लिस्बन कराराचे 50 वे कलम ब्रिटनने लागू केले असून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी चांगले संबंध टिकून राहावेत यासाठी हा करार केला जात आहे.