Antarctica (Photo Credits: File Image)

मागच्या वर्षापासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव करण्यास सुरुवात केली. सध्या जवळजवळ प्रत्येक खंडात हा व्हायरस पोहोचला आहे. यामध्ये अंटार्क्टिक खंड (Antarctic Continent) असा एक प्रदेश होता जो कोरोना विषाणूपासून सुरक्षित होता, मात्र आता तिथेही हा विषाणू पोहोचला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पृथ्वीच्या दक्षिणेकडील खंड अंटार्क्टिका येथील चिलीच्या Bernardo O'Higgins Research Station मधील 36 लोकांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. सोमवारी अंटार्क्टिकामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचल्याचे समोर आले. संक्रमित 26 लोक सैन्यात असून 10 लोक मेंटेनन्सवाले आहेत.

चिली सैन्याने (Chilean Army) या सर्व संक्रमित लोकांना परत बोलावून घेतले असल्याचे सांगितले आहे. अंटार्क्टिकाने यापूर्वी पर्यटकांच्या प्रवासावर बंदी घातली होती जेणेकरून खंड कोरोनापासून मुक्त राहू शकेल. आता असा विश्वास आहे की 27 नोव्हेंबर रोजी चिलीहून अंटार्क्टिका येथे काही समान आले व त्याचवेळी हा संसर्ग तिथे पोहोचला. सर्जेन्टो अल्डीया 27 नोव्हेंबर रोजी संशोधन केंद्रात आली आणि 10 डिसेंबरला परत चिलीला रवाना झाली. अंटार्कटिकामध्ये सामान उतरवून जेव्हा लोक जहाजावरून परत आले तेव्हा काही आठवड्यांनंतर 3 क्रू मेंबर्समध्ये हा विषाणू सापडला.

यावर, चिली सैन्य म्हणते की त्यांनी सप्लाय पाठविण्यापूर्वी सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट केली गेली होती. त्यावेळी सर्वांचा अहवाल नकारात्मक आला होता. अंटार्क्टिकामध्ये बर्‍याच देशांमध्ये संशोधन केंद्रे आहेत आणि येथे कोरोनामुळे येथे राहणाऱ्या लोकांवरही अनेक निर्बंध घातले गेले आहेत. या लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. यामुळे, संशोधन मोहिमेमध्येही समस्या उद्भवल्या आहेत. Bernardo O'Higgins संशोधन केंद्र हे अंटार्क्टिकमध्ये असलेल्या चिलीच्या चार कायम बेसेसपैकी एक आहे आणि ते सैन्याद्वारे चालविले जाते. (हेही वाचा: कोरोना व्हायरस लसीवर काम करत असलेल्या रशियाच्या प्रमुख शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू; 14 व्या मजल्यावरून पडले)

दरम्यान, चिली हा लॅटिन अमेरिकेतील कोरोना विषाणूमुळे प्रभावित असा सहावा देश आहे, जिथे 585,000 हून अधिक कोरोना व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे.