Red Heart Emoji पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास आणि लाखोंचा दंड, जाणून घ्या 'या' देशातील कडक कायदा
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही वर्षांत व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे जगातील एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे असे सर्व युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर करताना, अनेक लोक शब्दांऐवजी इमोजीच्या स्वरूपात भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, करोडो लोकांनी त्यांच्या जोडीदाराला किंवा मित्रांना रेड हार्ट इमोजी (Red Heart Emoji) पाठवले असेल. फेसबुकवर पोस्टला प्रतिसाद म्हणून रेड हार्ट इमोजीचा वापर सर्रास होतो. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, काही देशांमध्ये अशा इमोजीबाबत कडक कायदे आहेत.

सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) रेड हार्ट इमोजीबाबत काही कडक कायदे आहेत. या देशात सायबर कायदे खूप कडक आहेत. येथे कुटुंबातील सदस्यांना किंवा जोडीदाराला रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी तुम्हाला 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. दुसरीकडे, विशेष परिस्थितीत दोन वर्षे कारावास आणि वीस लाखांचा दंड होऊ शकतो. मात्र, हे तेव्हाच घडेल जेव्हा हा मेसेज प्राप्त करणारा पोलिसांकडे याबाबत तक्रार करेल. (हेही वाचा: Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

व्यक्तीचा असा पहिला गुन्हा असल्यास त्यांना 2 वर्षे व 20 लाखाचा दंड असेल, परंतु जर का तो दुसऱ्यांदा अशा गुन्ह्यात अडकला तर, त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि 3 लाख सौदी रियाल म्हणजेच सुमारे 60 लाखांचा दंड भरावा लागेल. सौदी सायबर एक्सपर्ट म्हणतात की, सौदी कायद्यानुसार रेड हार्ट इमोजीबाबत कडक नियम आहेत त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. सौदीमध्ये रेड हार्ट इमोजी पाठवणे ही गोष्ट छळाच्या कायद्याखाली ठेवण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये अशा गुन्ह्यांसाठी कोणतीही माफी नाही.