UK 'Total Lockdown' From Next Week? ब्रिटेन मध्ये पुढच्या आठवड्यापासून पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता; ख्रिसमसपूर्वी दिवसाला 4000 मृत्यू होण्याचा वैज्ञानिकांचा इशारा
British Prime Minister Boris Johnson (Photo Credits: Facebook)

कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग रोखण्यासाठी युनायटेड किंगडम  (United Kingdom) मध्ये पुढील आठवड्यापासून कठोर लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा विचार सुरु आहे. कठोर निर्बंध नसल्यास दिवसाला 4,000 मृत्यू होऊ शकतात, असा इशारा देशातील सर्वोच्च वैज्ञानिकांनी पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांना दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला जावू शकतो.

सायंटिफिक अॅडव्हाजरी ग्रुप फॉर इमर्जन्सी (SAGE) यांनी No 10 Downing Street ला दिलेल्या रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार पहिल्या लाटेपेक्षा आता अधिक जलद गतीने होत आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरोना संसर्गामुळे 85,000 नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज पॅनलने वर्तवला आहे.

उन्हाळात देशात कडक निर्बंध लावल्याने पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर विरोधकांकडून प्रचंड टीका झाली. या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडले. त्यामुळे संपूर्ण देशातून त्यांच्यावर सर्किट ब्रेकर अशी टीका होऊ लागली. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व राज्य आणि जिल्ह्यांमधील अति गर्दीची ठिकाणांवर बंदी घालणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. (COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca ची कोरोना व्हायरस वरील लस युके मध्ये पुढील 3 महिन्यांत तयार- रिपोर्ट्स)

SAGE committee ने दिलेल्या रिपोर्टनुसार, Mat Hancock आणि Michael Gove यांच्यासह  जॉनसन कॅबिनेटचे इतर सदस्यांनी देखील कठोर लॉकडाऊनसाठी समर्थन दर्शवले आहे. (UK Sex Ban: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम)

यूकेच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात लागू होणारे लॉकडाऊन एप्रिल मे प्रमाणेच असेल. दरम्यान, ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरु होण्यापूर्वी शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसारच सुरु राहतील. तसंच या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.  तसंच ख्रिसमसपूर्वी लॉकडाऊनचे नियम शिथील केले जातील. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या मध्यात कोविड-19 ची स्थिती तपासून लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यात येईल.