UK Sex Ban: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

युके मध्ये वाढत्या कोरोना वायरस संसर्गाचा (Coronavirus Infection) धोका रोखण्यासाठी कडक नियमावली आखण्यात आली आहे. यामध्ये आता नव्या लॉकडाऊन स्ट्रॅटेजीनुसार (Lockdown Strategy) हाय रिस्क एरियामध्ये राहणार्‍या जोडप्यांसाठी जर ते वेगवेगळे राहत असतील तर त्यांना इनओडर एकत्र भेटता येणार नाही. सध्या युकेच्या या नव्या नियमाला Sex Ban म्हणून संबोधलं जात आहे. युके (UK) मध्ये वेगवेगळे राहणार्‍या कपल्स आणि सिंगल्ससाठी आऊटडोअर (Outdoor) भेटण्याची परवानगी आहे. हॉटस्पॉट्समध्येही ही परवानगी दिली असली तरीही त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. त्यांना एकमेकांना स्पर्शदेखील करता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. Sex मार्फत पसरू शकतो Coronavirus? COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता.

नव्या नियमावलीनुसार, सध्या केवळ त्याच लोकांना लॉकडाऊनमध्ये भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे आधीपासूनच एकत्र राहतात. किंवा जे ‘support bubble’मध्ये सहभागी आहेत. इंग्लंडमध्ये निम्मी लोकसंख्या सध्या हाय आणि व्हेरी हाय रिस्क झोनमध्ये आहे. अनेकांसाठी आता नव्या नियमावलीनुसार पुढील काही महिने सेक्स करण्यावर बंदी असेल. Sex In Coronavirus: कोरोना काळात एकत्र न राहणार्‍या कपल्सने भेटल्यावर सेक्स करताना काय काळजी घ्यावी?

जोडप्यांसाठी नवी लॉकडाऊन नियमावली कशी असेल?

  • सरकारच्या माहितीनुसार कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार Tier 1, Tier 2 आणि Tier 3 मध्ये प्रदेशाची विभागणी करण्यात आली आहे. याममध्येही Tier 2 आणि Tier 3 मध्ये हाय आणि व्हेरी हाय रिस्क भागांचा समावेश तर Tier 1मध्ये मिडियम रिस्क लोकेशनचा समावेश आहे.
  • युके मध्ये सध्या ‘rule of six’देखील लागू आहे. यामध्ये 6 पेक्षा जास्त लोकं एकावेळी भेटू शकत नाहीत.
  • कपल्सना सध्या कॅज्युअल सेक्स साठी देखील परवानगी नसेल.

मागील काही दिवसांमध्ये युकेत पुन्हा कोरोना वायरस संकटाचा कहर सुरू झाला आहे. रूग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता कमी करण्यात आली असून लॉकडाऊनचे नवे नियम नागरिकांवर लादण्यात आले आहेत.