Sex मार्फत पसरू शकतो Coronavirus? COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता
Coronavirus sexual transmission (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मानवी शरीरात पसरण्याचा मार्ग अभ्यासत असताना आता एक नवी शक्यता समोर येत आहे. मागील काळात सेक्स (Sex) मधून कोरोना पसरू शकतो का हा तर अगदी नेहमी विचारला जाणारा, ऑनलाईन सर्च केला जाणारा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर आता काहीसे समोर येत आहे. दुर्दैवाने हे उत्तर सकारात्मक असल्याने या कोरोनासंकटात भर पडण्याची शक्यता आहे. अलीकडे झालेल्या एका अभ्यासात कोरोना व्हायरस रूग्णांच्या वीर्यमध्ये वैज्ञानिकांना विषाणू सापडले आहे. चीनमधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे ज्यांनी कोविड 19 पॉझिटिव्ह चाचणी केलेल्या पुरुषांच्या वीर्य नमुन्यांचे विश्लेषण केले. यावरून संशोधकांनी कोरोना व्हायरस हा लैंगिक प्रक्रियेतून सुद्धा पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे, असे असले तरी या संशोधकांनी याची पुष्टी केलेली नाही. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून

हेनान प्रांतातील शांगकियू येथील कोविड 19 च्या उपचारांसाठी नेमलेले एकमेव केंद्र असलेल्या शांगकियू मनपा रुग्णालयात हा अभ्यास करण्यात आला. चीनी लोकांच्या लिबरेशन आर्मी जनरल हॉस्पिटल, बीजिंग येथील डॉ. डायगेन्ग ली यांच्या नेतृत्वात या पेपरच्या लेखकांनी सुचवले की कोरोना व्हायरस लैंगिक संसर्ग सुद्धा ठरू शकतो. संशोधकांनी पुरुषांच्या 38 हून अधिक वीर्य नमुन्यांचे विश्लेषण केले, यातील काही जण हे कोरोनातून बरे झालेले होते तर काही अभ्यासाच्या वेळी कोरोनाबाधित होते. यातील 12 जण गंभीर आजाराच्या अवस्थेत होते. या अभ्यासात त्यांना आढळले की सहापैकी एकाच्या त्यांच्या वीर्यात कोरोना व्हायरसचे विषाणू आहेत. तसेच, बरे झालेल्या पुरुषांच्या मध्येही 8.7% रुग्णांच्या वीर्यात कोविड -19 चे अंश होते.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वीर्यामध्ये आढळलेले विषाणू हे दीर्घ काळासाठी टिकून राहतात की नाही याबद्दल पाठपुरावा केला गेला नाही. सुरक्षेचा मार्ग म्हणून या टीम ने कोरोना व्हायरस बाधित रुग्णानं लैंगिक संबंध न राखण्याचा सल्ला दिला आहे. सेक्स करताना कंडोमचा वापर केल्यास हे संक्रमण पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो. मात्र आता यापुढे केवळ कोरोनाबाधित रुग्णाच्या लाळ आणि रक्ताचा संपर्क टाळण्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही. रूग्णातील वीर्य सुद्धा कोरोना विषाणूचे वाहक ठरू शकते. Coronavirus Outbreak: कोरोना मुळे Condom आणि Contraceptives च्या विक्रीत चकित करणारी वाढ; वाचा विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, चीनमध्ये टोंगजी मेडिकल कॉलेजच्या अभ्यासानुसार 34 चिनी पुरुषांमध्ये वीर्यमध्ये विषाणूचा पुरावा मिळालेला नाही. हा अभ्यास 'फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी टिप ’या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. अद्याप, कोरोनाव्हायरस पसरण्याचा वीर्य हे कारण आहे की नाही हे अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही मात्र तशी शक्यता असल्याने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असा इशारा संशोधकांनी दिला आहे.