कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात लॉक डाऊन (Lock Down) जारी करण्यात आले आहे. परिणामी प्रत्येक व्यक्ती जिथे आहे तिथे अडकून पडली आहे. अनेक व्यापार व्यवसायांवर सुद्धा यामुळे संकट आले आहे, मात्र एक असा व्यवसाय आहे ज्यात या लॉक डाऊन नंतर विक्रमी किंबहुना चकित करणारी वाढ झाली आहे. हा व्यापार म्हणजे कंडोम चा! घरात बसून वैतागलेल्या अनेकांनी आपल्या बोअरडम वरील उपाय म्हणून सेक्स ऍक्टिव्हिटी (Sex) करण्याचा पर्याय निवडला आहे आणि त्यामुळेच कॉन्डम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत (Condom Sells) विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येतेय, मेडीकल दुकानदारांच्या माहितीनुसार मागील काहीच आठवड्यात कॉन्डोम च्या विक्रीत 25 ते 50% इतकी मोठी वाढ झाली आहे. यातील काही विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया हिंदुस्थान टाइम्स ने घेतल्या आहेत, यातील काही निवडक प्रतिक्रिया इथे वाचा..
दक्षिण मुंबईतील एका मेडिकल दुकानाच्या विक्रेत्याने सांगितल्यप्रमाणे, काँडोमच्या विक्रीत मंदी अशी कधीच नव्हती मात्र लोक खरेदी करताना कमी प्रमाणात करत होते म्हणजे एका वेळेस दोन किंवा तीन पाकीट हा प्रति ग्राहक विक्रीचा टक्का होता, मात्र आता लोक एकाच वेळी जास्त प्रमाणात कॉन्डोम खरेदी करत आहेत, एकाच वेळेत एकाच व्यक्तीला 10 ते 15 पाकिटे विकल्याचा रेकॉर्ड या लॉक डाऊन मुळे करता आला आहे.
Coronavirus मुळे घरी अडकलेल्या इटलीतील नागरिकांना Pornhub ने दिले मोफत सब्सक्रिप्शन
तर दुसऱ्या एका विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे, साधरणतः इतकी जास्त विक्री डिसेंबर मध्ये होते, मात्र आता लोक घरातून सतत बाहेर पडायला लागू नये म्ह्णून एकाच वेळेस औषधे आणि कॉन्डोम साठवून ठेवत आहेत. दुसरीकडे काँडोम्स सोबतच अनेक महिलांकडून गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी सुद्धा वाढली आहे, दिवसाला या गोळ्यांचा 15 टक्के खप होत आहे आणि या ग्राहक महिलाच आहेत. असेही औषध विक्रेत्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी केलेल्या घोषणेनुसार, आज मध्यरात्री पासून पुढील 21 दिवस देशातील लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे, याचा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर काहीही परिणाम होणार नाही असेही काल मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.