Coronavirus मुळे घरी अडकलेल्या इटलीतील नागरिकांना Pornhub ने दिले मोफत सब्सक्रिप्शन
Representational Image (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस ने जगभरातील लोकांना हादरवून सोडले असून इटलीत लॉकडाऊन (Italy Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिक गेले काही दिवस घरातच अडकून पडले आहे. कोरोना व्हायरस मुळे घराबाहेर पडता येत नसल्या कारणाने घरात विरंगुळ्याचे साधन मिळत नाही. त्यांची ही गरज लक्षात घेता Pornhub ने इटलीतील नागरिकांना 3 एप्रिल पर्यंत मोफत सब्सक्रिप्शन दिले आहे. Pornhub ARIA ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पॉर्नहबचे मोफत सब्सस्क्रिप्शन म्हणजे इटलीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस विरंगुळ्याचे माध्यम बनेल अशी अपेक्षा पॉर्नहबला आहे.

इतकंच नव्हे पॉर्न हब आपल्या मॉडेलहब मधून मिळणा-या नफ्याची काही रक्कम कोरोना विरुद्ध लढण्यासाठी इटली शहराला देणार आहे. ही खूपच स्तुत्यप्रिय गोष्ट असली तरीही नागरिकांना अॅडल्ट साइटचे मोफत सब्सक्रिप्शन देणे ही थोडी विचित्र पण मजेशीर गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. Coronavirus: कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील वृद्धाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्नहबने 2019 मध्ये केल्या सर्वेक्षणात, पॉर्न साइट बघणा-या देशांच्या यादीत इटली 7 व्या क्रमांकांचा देश होता. कोरोना व्हायरसमुळे मागील काही दिवस इटलीत लॉकडाऊन सुरु आहे. नागरिकांना केवळ गरजेपुरता, औषधोपचारांसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कारणाशिवाय घराबाहेर पडणा-या लोकांना $2,800 दंड आकारण्यात येणार आहे. तसेच 3 महिन्यासाठी तुरुंगात रवानगी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे घराबाहेर पडता न येणा-या अशा लोकांसाठी इटलीत सुरु केलेली Pornhub ची मोफत सेवा ही पर्वणीच ठरणार असं म्हणायला हरकत नाही.