COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरना व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील कलबुर्गी (Kalburgi) येथे 76 वर्षीय वृद्धास कोरोना व्हायरस (Coronavirus) लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच या वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृ्त्यू संशयास्पद मानला जात होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत अधिकृत सांगितले जात नव्हते. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकच्या आरोग्या विभागाने या वृद्धाचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाला असल्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या वृद्धाच्या रुपात कोरोना व्हायरसने भारतात पहिला बळी घेतला आहे. दरम्यान देशभरातील विविध राज्यांतून कोरोना व्हायरस म्हणजेच COVID 19 संक्रमीत रुग्णांची संख्या वाढत आहे. COVID 19 बाधीत रुग्णांचा ताजा आकडा 73 वर पोहोचला असल्याचे समजते.

कोरोना व्हायरसने जगभगात थैमान घातले आहे. जगभरातील वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञ कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्याला यश मिळू शकले नाही. कोरोना वायरस उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 3000 नागरिकांचा बळी गेला आहे. तर, जगभरातही या विषाणूने अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊन तब्बल 400 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, जगभरातील कोरोणा व्हायरस बाधित नागरिकांची संख्या ही 1.15 लाखांहून अधिक आहे. (हेही वाचा, Covid-19: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितला राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा अधिकृत आकडा)

एएनआय ट्विट

भारतामध्येही महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसग्रस्त नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे.