रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेने (US) रशियावर काही आर्थिक बंदी घातल्या आहेत. दुसऱ्या बाजूला रशियाने अमेरिकेतील टेक कंपन्यांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर (Facebook) बंदी घातली गेली आहे. रशियाने फेसबुकच्या वापरावर प्रतिबंध लादले आहेत.(Russia-Ukraine Crisis: युक्रेन-रशिया युद्धामुळे स्मार्टफोनच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण)
रशियाने आरोप लावला आहे की, फेसबुक युक्रेनकडून रशिवायवर सैन्याच्या अभियानासंदर्भातील दावे चढवून सांगत आहे. याच कारणास्तव अशा सर्व पोस्टला सेंसर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रशियाच्या राज्य संचार नियामकचे असे म्हणणे आहे की, फेसबुकन आपल्या प्लॅटफॉर्मवर चार रशिया मीडिया आउटलेट्स- आरआईए न्यूज एजेंसी, संरक्षण मंत्रालयचे ज़्वेज़्दा टीव्ही आणि वेबसाइट gazeta.ru व lenta.ru वरील प्रतिबंध हटवण्याच्या त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
मेटा हेड ग्लोबल अफेअर निक क्लेग (Nick Clegg) यांनी असे म्हटले की, रशिया अथॉरिटीने आदेश दिले आहेत की, फेसबुकने फॅक्ट चेक आणि कटेंटला लेबलिंग करण्याचे काम बंद करावे. परंतु फेसबुकने तसे करण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच रशियाने फेसबुकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने आउटसाइट फॅक्ट चेक सोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये रॉयटर्स सारख्या एजेंसीचा समावेश आहे. जे फेक न्यूज बद्दल माहिती देतात.
अमेरिकेचे सीनेटर मार्क वॉर्नर यांनी फेसबुक, युट्यूब आणि अन्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले, कंपन्यांचे असे कर्तव्य आहे की रशिया आणि त्यासंबंधित संस्थेकडून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला जाऊ नये. गुगलने असे म्हटले की, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या नियमांचे उल्लंघन केल्याने शेकडो युट्युब चॅनल आणि हजारो व्हिडिओ हटवले आहेत. ट्विटरकडून काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.