Firing | (Photo Credits: Pixabay)

Russia: रशियातील युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याने लोकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. तपासकर्त्यांच्या मते रशियातील पर्म सिटीत एका विद्यार्थ्याने गोळीबार सुरु केला. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. ही घटना एका युनिव्हर्सिटी जवळील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत असे दिसून येत आहे की, लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारत आहेत.

असे सांगितले जात आहे की, एक अज्ञात व्यक्ती पीएसयूच्या एका इमारतीत घुसला आणि त्याने अचानक गोळीबार सुरु केला. हत्यार असलेला हा व्यक्ती जवळजवळ 11 वाजता युनिव्हर्सिटीच्या येथे आला. गोळीबार केल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.(Neighbour Women's Undergarments: नवऱ्याच्या सुट्टी दिवशी अंतर्वस्त्रे उघड्यावर सुखवते, शेजारीणी विरोधात महिलेची पोलिसात तक्रार)

Tweet:

रशियाच्या टएएसएस न्यूज एजेंसीच्या मते सुत्रांनी असे सांगितले की, काही घटनेच्या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी स्वत:ला ऑडिटोरियम मध्ये बंद करुन घेतले होते. कारण हल्लेखोरापासून बचाव करता येईल म्हणून त्यांनी असे केले. मात्र काही जण खिडक्यांमधून उड्या टाकत पळ काढताना दिसले. सुरक्षा बल योग्य वेळी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तपासादरम्यान असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हल्लेखोर हा युनिव्हर्सिटी मधील 18 वर्षीय विद्यार्थी असू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे ट्रॉमेटिक हत्यार होते.