Neighbour Women's Undergarments: नवऱ्याच्या सुट्टी दिवशी अंतर्वस्त्रे उघड्यावर सुखवते, शेजारीणी विरोधात महिलेची पोलिसात तक्रार
Undergarments | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंतर्वस्त्र (Undergarments) अनेक महिलांसाठी भलताच भावनिक मुद्दा. अशाच एका महिलेने चक्क आपल्या शेजारी ( (Neighbour) महिलेविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या महिलेने पोलिसात तक्रार देऊन शेजारणीला अटक करावी अशी मागणीही केली आहे. या महिलेच्या मागणीचे अजब कारण पाहून पोलिसही भलतेच अवाक झाले. होय, या महिलेने आपल्या तक्रारीत दावा केला की, शेजारीण महिला ही आपली अंतर्वस्त्रे (Neighbour Women's Undergarments) उघड्यावर सुखवते. तसेच, आपल्या नवऱ्याच्या सुट्टीदिवशीच ती असे करते. जेणेकरुन तिची तिची अंतर्वस्त्रे (Women Undergarments) पाहून आपला नवरा तिच्याकडे आकर्षीत व्हावा. तिच्या या वागण्यामुळे आमचा संसार मोडू शकतो. त्यामुळे तिला अटक करा.

मेक्सिको (Mexico) येथील 42 वर्षांच्या युवित्जा (Yuvitza) नामक महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. युवित्जा नामक महिलेच्या शेजारी एक 23 वर्षांची तरुणी राहायची. ही तरुणी आपल्या घराबाहेर तिची अंतरवस्त्रे उघड्यावर सुखवत असे. तिच्या या सवयीबाबत युवित्जा ने त्या 23 वर्षीय तरुणीला अनेकदा समजावले. परंतू, तिने तिचे ऐकले नाही. तिने अंतरवस्त्रे उघड्यावर सुखवण्याचा प्रकार सुरुच ठेवला. शेवटी कंटाळलेल्या युवित्जा हिने पोलिसांत जाण्याचा पर्याय निवडला. (हेही वाचा, पुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय)

युवित्जा हिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन शेजारणीला अटक करण्याची मागणी केली. 'द सन' ने याबाबत वृत्त दिले आहे. युवित्जा हिचा आरोप असा की, तिचा नवरा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हाच ती तशी करते. आपला नवरा तिच्याकडे आकर्षीत व्हावा असे तिला वाटते म्हणूनच ती असे करते, असा युवित्जाचा दावा आहे. दरम्यान, खुल्या ठिकाणी कपडे सुकवणे हा गुन्हा नाही. त्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई करू शकत नाही, असे सांगत पोलिसांनी तक्रारदार महिलेची बोळवण केली आहे.