गणपती हा 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती आहे. अनेक शुभ कार्यांची सुरूवात ही गणेश पूजनाने होते. पैसा, विद्या घरात नांदत रहावा, अमंगल गोष्टी दूर रहाव्यात म्हणून गणपतीची आराधना केली जाते. मनोकामना पूर्ण करणारा हा बाप्पा केवळ भारतीयांचे श्रद्धास्थान नव्हे तर परदेशातही त्याची खास पूजा केली जाते.
इंडोनेशिया हा मुस्लिम बहूसंख्य देश आहे. 87.5% लोकसंख्या मुसलमान आहे. तर 3% हिंदू इंडोनेशियात आहेत. इंडोनेशियाच्या चलनातील नोटेवर गणपतीचा फोटो आहे. अशाप्रकारे नोटेवर गणपतीचा फोटो छापण्याचं कारणंही तितकंच खास आहे.
२०,००० च्या नोटेवर गणपतीचा फोटो
इंडोनेशियाच्या चलनालाही रूपया म्हणतात. त्यांच्या 20,000 च्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था संकटात होती. १९९७ साली अनेक आशियन देशांभध्ये चलनांत अवमूल्यन होत होते. ते रोखण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. गणपतीचा फोटो नोटेवर छापल्यानंतर हळूहळू सकारात्मक परिणाम दिसायला लागले. हा परिणाम बाप्पाच्या आशिर्वादाने झाला अशी त्यांची धारणा आहे.
नोटेचं खास महत्त्व
इंडोनेशियामध्ये शिक्षण,कला आणि विज्ञानाची देवता म्हणून गणपतीला मानले जाते. 20,000 च्या नोटेवर पुढील बाजूला गणपती तर मागील बाजूला विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एकत्र फोटो आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांंचा फोटो आहे.
भारतीय संस्कृतीचं इंडोनेशियात होतं दर्शन
इंडोनेशियामध्ये गणपतीप्रमाणेच हनुमानालाही खास स्थान आहे. इंडोनेशियन आर्मीचा मेस्कॉट हनुमान आहे. जकार्ता स्केअर या पर्यटनस्थळी अर्जून आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सोबतच घटोत्कचाचीही मूर्ती आहे. हिंदू पुराणांचा प्रभाव बाली टूरिझमच्या लोगोवरही दिसतो.