Moon (PC - Pixabay)

Rocket Crashes into the Moon: आज चंद्रावर एक मोठी घटना घडणार आहे. जानेवारीमध्ये पहिल्यांदा टक्कर होण्याची भविष्यवाणी करणाऱ्या शास्त्रज्ञाने सांगितलं आहे की, रॉकेटचा सोडून दिलेला भाग चंद्रावर कोसळण्यापासून काही तासांच्या अंतरावर आहे. 5,800mph वेगाने अंतराळात जाणारा तीन टन वजनाचा रॉकेट भाग शुक्रवारी 12:25 वाजता धडकेल अशी अपेक्षा आहे. खगोलशास्त्रज्ञांना प्रथम वाटले की, रॉकेटचा भाग एलोन मस्कच्या स्पेसएक्स प्रोग्रामद्वारे प्रक्षेपित केला गेला आहे आणि नंतर तो चीनी असल्याचे सांगितले गेल. मात्र यास चीनने नकार दिला. पुढील काही तासात हा अपघात घडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते या घटनेनंतर 10-20 मीटर रुंद खड्डा तयार होईल. त्यानंतर चंद्राच्या धूलिकणांचा अभ्यास करण्यात येईल. मार्च 2015 मध्ये पृथ्वीवरून रॉकेटचा भाग प्रथम दिसला. ऍरिझोनामधील नासा-निधीत केलेल्या अंतराळ सर्वेक्षणात तो आढळला.

रॉकेटचा भाग स्पेस जंक म्हणून ओळखला जातो. हा भाग पृथ्वीवर परत येण्यासाठी पुरेसे इंधन किंवा उर्जा नसताना मिशन किंवा उपग्रहांमधून टाकून दिलेले हार्डवेअर असतो. काही तुकडे पृथ्वीच्या अगदी वर, आपल्या जवळ आहेत, परंतु इतर, या बूस्टरसारखे, पृथ्वीच्या वातावरणापासून दूर, उच्च कक्षेत हजारो मैल दूर आहेत. (वाचा - Russia-Ukraine War: रशियाकडून युक्रेनच्या Nuclear Power प्लांटवर हल्ला; जग चिंतेत, महत्त्वपूर्ण अपडेट)

दरम्यान, युरोपियन स्पेस एजन्सीचा अंदाज आहे की आता 10 सेमीपेक्षा जास्त अंतराळ जंकचे 36,500 तुकडे आहेत. कोणताही स्पेस प्रोग्राम किंवा विद्यापीठ औपचारिकपणे खोल अंतराळ जंकचा मागोवा घेत नाही. बूस्टर प्रथम दिसल्यानंतर सहा आठवड्यांनंतर, पीटर बर्टव्हिसल इंग्लंडच्या दक्षिणेकडील न्यूबरी येथील त्याच्या बागेतून लघुग्रहांसाठी आकाश पाहत होते. त्याच्या दुर्बिणीने आकाशात प्रकाशाचा मागोवा घेणारा एक छोटासा ठिपका उचलला. गणनेनुसार तो रॉकेटचा भाग होता, असे त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितले.

सात वर्षांपासून त्यांनी रॉकेटचा भाग क्वचितच पाहिला होतो. मात्र, जानेवारीमध्ये तो पुन्हा दिसला. त्यांनी सांगितलं की, जेव्हा तो पृथ्वीच्या जवळून गेले तेव्हा मी काही प्रतिमा काढल्या. त्यांनी हे फोटोज अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील खगोलशास्त्रज्ञ आणि डेटा सायंटिस्ट बिल ग्रे यांना पाठवली. त्यानंतर अब्जाधीश एलोन मस्कच्या अंतराळ मोहिमेतील एक टाकून दिलेला भाग चंद्रावर धडकणार असल्याची बातमी जागतिक मथळे बनली.