Imran Khan (Photo Credits: IANS)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. इम्रान खान यांनी विधान करत असे म्हटले आहे की, पाकिस्तानात लैंगिक शोषणाचे प्रकार वाढण्यामागील कारण म्हणजे बॉलिवूड चित्रपट आहे. लैंगिक शोषणाबाबत असे विधान करत त्यांनी याचे खापर आता बॉलिवूडवर फोडले आहे. नुकत्याच एका रिपोर्टनुसार, देशातील वाढते लैंगिक शोषणाचे प्रकारासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट जबाबदार आहेत. ऐवढेच नव्हे तर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानात या दोन्ही माध्यमातील कन्टेट येत असल्याने त्याचा तरुणांवर परिणाम झाला आहे.

तसेच शाळेतील मुले ड्रग्जच्या आहारी जात असून घाणेरडे कन्टेट त्यांच्या मोबाईलमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळेच ते चुकीच्या मार्गाला जात असून लैंगिक शोषणाचे प्रकार वाढतायात. बहुतांश तरुणांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. देशातील मुलांची मानसिकता वाईट होत चालली असून सेक्स क्राइम मध्ये प्रत्येक दिवसाला वाढ होत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास देशाचे भवितव्य खराब होईल.(कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने घेतला भारतासोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय)

जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व राजकीय, व्यापार आणि समझौता एक्सप्रेसवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता सरकराने भारतीय चित्रपटांवर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात भारतातील काही चित्रपट सुद्धा प्रदर्शित करण्यात आले नाहीत.