Imran Khan (Photo Credits: IANS)

मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत (Lok Sabha) जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) विभाजन विधेय मांडल्यानंतर ते बहुमताने मंजूर झाले आहे. तर कलम 370 जम्मू-कश्मीर मधून हटवल्यानंतर त्यांचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. यानंतर मात्र पाकिस्तान चांगलाच संतापला असून आज भारता विरुद्ध तीन मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत मोदी सरकारने कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयावरुन चर्चा झाली. तेव्हाच पाकिस्तानने भारतासोबत सर्व राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व व्यापार संबंध सुद्धा पाकिस्तान भारतासोबत तोडणार आहे. त्याचसोबत कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयावर पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्रामध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी सुद्धा भारत जर आमच्यासोबत कोणतीही बातचीत करणार नसल्यास त्यांच्यासोबत राजकिय संबंध ठेवून काय फायदा असे म्हटले होते.(कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची सटकली, इमारान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांची भारताला युद्धाची धमकी)

तसेच फवाद यांनी भारताला यु्द्धाची धमकी देत असल्याचे एक ट्वीट मंगळवारी केले. त्यामध्ये भारत पाकिस्तानला फिलिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर पाकिस्तान आता भारताला या निर्णयाचे उत्तर रक्त आणि अश्रूंनी देणार असल्याचे ही फवाद खान यांनी म्हटले आहे.