कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची सटकली, इमारान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांची भारताला युद्धाची धमकी
नरेंद्र मोदी आणि फवाद खान (फोटो सौजन्य- PTI/TW)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवल्याने पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान  खान (Imran Khan) यांच्यासह त्यांच्या सरकारमधील अन्य मंत्र्यांची सटकली आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयावर पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळा सोबत बैठका घेणार आहेत. या परिस्थित पाकिस्तान मंत्री फवाद चौधरी याने तर युद्ध करणार असल्याचे म्हटले आहे. याबद्दल एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, भारत हा पाकिस्तानला फिलिस्तीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. संसदेत नको त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा भारताला या निर्णयाचे उत्तर अश्रू, रक्त आणि घाम याच्यामाध्यमातून द्यावे लागेल. आम्ही युद्धासाठी तयार आहोत.

नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार नियंत्रण सीमारेषेवरची परिस्थिती पाहता रावळपिंडी येथे पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी कोर कमांडरसह एक बैठक केली. त्याचसोबत राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसदेत एक संयुक्त सत्र बोलावले होते. तसेच पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी इमरान खान यांना खुप सुनावले आहे.(जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवला तरीही लढाई सुरु ठेवणार, पाकिस्तानची प्रतिक्रिया)

पाकिस्तान माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरिय नवाज हिनेसुद्धा इमरान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिने असे म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांनी कश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीबाबत इमरान खान यांना बोलून मुर्ख बनवले आहे. यामुळे इमरान खान अंदाजपण नाही लावणार की भारत नेमकी कोणती योजना बनवत आहे. मोदी सरकारने जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्याने पाकिस्तानची तणतणली आहे.