कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन याचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. अशातच ओमिक्रॉन हा 77 देशात पसरल्याची माहिती समोर आली आहे.याच पार्श्वभूमीवर डब्लूएचओने असे म्हटले आहे की, आतापर्यंत 77 देशात ओमिक्रॉनच्या वेरियंटची प्रकरणे समोर आली आहेत. मात्र हा आकडा आणखी काही देशात वाढण्याचा सुद्धा शक्यता असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे.(ब्रिटन येथे ओमिक्रॉनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची राष्ट्राध्यक्ष बोरिस जॉनसन यांची माहिती)
डब्लूएचओचे महानिर्देशक डॉक्टर टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी असे म्हटले की, आतापर्यंत 77 देशात ओमिक्रॉन वेरियंटची सुचना दिली असून वास्तिवकता अशी आहे की, अधिक देशात आहे पण त्याबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, ओमिक्रॉन ज्या दराने पसरत आहात तोच वेग गेल्या कोणत्याही वेरियंटमध्ये दिसून आलेला नाही.
Tweet:
77 countries have now reported cases of #Omicron & the reality is that Omicron is probably in most countries, even if it hasn’t been detected yet. Omicron is spreading at a rate we have not seen with any previous variant: Tedros A Ghebreyesus, Director-General of WHO
(File pic) pic.twitter.com/JxHnPydiQ9
— ANI (@ANI) December 14, 2021
या वेरियंटमुळे संपूर्ण जगात 8500 हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. सध्या ओमिक्रॉन मुळे एका व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉनमुळे संक्रमित झालेल्यांची सर्वाधिक संख्या ही ब्रिटेन येथे आहे. येथील 3100 लोकांना या वेरियंटचे संक्रमण झाले आहे.(Omicron: अमेरिकेत बूस्टर डोस दिलेल्यांना सुद्धा संक्रमण, नव्या वेरियंटमुळे 58 टक्के तरुण वर्ग प्रभावित)
दरम्यान, सुरुवातीला असे कळले दक्षिण अफ्रिकेत प्रकरण कमी होत आहेत. पण जगभरात बूस्टर डोस दिल्यानंतर सुद्धा ओमिक्रॉनचे संक्रमण होत आहे. इज्राइल, अमेरिका सारख्या देशात लोकांना बूस्टर डोस सुद्धा दिला जात आहे.
भारतातील ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास येथे 43 रुग्ण आढळले आहेत. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा स्तर कमी होतो. श्वास घेणे आणि चव घेण्याची क्षमता सुद्धा गायब होते, या व्यतिरिक्त संक्रमित रुग्णांमध्ये खुप दिवस ताप सुद्धा राहत नाही. पण रुग्णांमध्ये खुप थकवा आणि सुखा खोकला येतो. या व्यतिरिक्त पाकिस्तान मध्ये सुद्धा ओमिक्रॉनने एन्ट्री केली आहे.