Omicron: अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे अधिक चिंता वाढली गेली आहे. कारण येथील नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर बूस्टर डोस ही दिला गेला आहे. परंतु तरीही कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे लोक संक्रमित होत आहे. शुक्रवारी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 43 रुग्णांपैकी बहुतांश जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर बूस्टर डोस घेतलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती सुद्धा कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे संक्रमित होत आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड्र प्रिव्हेंनशन (CDC) यांनी असे म्हटले की, देशात ओमिक्रॉनचे 43 रुग्ण आढळले आहेत. यामधील 34 जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर 14 लोकांनी बूस्टर डोस ही घेतला आहे. परंतु यामधील 5 लोक असे आहेत ज्यांनी 14 किंवा त्यापेक्षा कमी दिवसात बूस्टर डोस घेतला आहे. तर सध्याच्या कोविड19 वरील लस या कोरोनाच्या नव्या वेरियंटवर कमी सुरक्षितता देत असल्याचे दिसून येत आहे.(कॅनडा मध्ये कोरोनाचा नवा वेरियंट Omicron चे 15 रुग्ण आढळल्याची माहिती)
तर देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 25 रुग्ण हे 18-39 वयोगटातील आहेत. तर 14 जणांना आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. 6 जण आधीच सुद्धा कोरोनामुळे संक्रमित झाले होते. तर बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षण दिसून येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, एकदोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 1 डिसेंबरला आढळून आला होता. तो रुग्ण अफ्रिकेतून आला होता आणि त्याने दोन्ही डोस घेतले होते. अमेरिकेत आतापर्यंत एकूण प्रकरणांपैकी डेल्टाचे 99 टक्के प्रकरणे समोर आले आहेत. परंतु साउथ अफ्रिकातून मिळालेल्या डेटानुसार कोरोनाचा वेरियंट अधिक संक्रमक आहे.