Short-Range-Missile | (File Image)

उत्तर कोरियाने (North Korea) 'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र' (Unidentified Ballistic Missile) डागल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी सियोल (Seoul) येथील लष्कराने दिलेल्या माहितीचा हवाला देऊन एएफपी न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे. हाच धागा पकडत एएनआय वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात आगोदरच युद्ध सुरु आहे. अशातच उत्तर कोरिया विरुद्ध दक्षिण कोरिया असा वाद पेटला तर जग पुन्हा एकदा नव्या युद्धाला सामोरे जाईल अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सियोल लष्कराने बुधवारी (2 नोव्हेंबर) केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, उत्तर कोरियाचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या किनारपट्टीपासून 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आले. हे त्रेपणास्त्र आल्याची स्पष्ट चाचणी झाल्यानंतरच हवाई हल्ल्यासंदर्भात इशारा देण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, उत्तर कोरियाने समुद्राच्या दिशेने तीन क्षेपणास्त्रे डागल्यानंतर दक्षिण कोरियाने त्यांच्या पूर्व किनाऱ्यावरील बेटावरील रहिवाशांसाठी हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला आहे.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा वोनसानच्या पूर्व किनारपट्टी भागातून बुधवारी सकाळी केला. (हेही वाचा, North Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा)

जेसीएसने सांगितले की किमान एक क्षेपणास्त्र उत्तरी सीमा रेषेच्या (एनएलएल) दक्षिणेस 26 किलोमीटर अंतरावर, एक वादग्रस्त आंतर-कोरियन सागरी सीमा आहे. क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या सोक्चो शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर, पूर्व किनाऱ्यावर आणि उल्युंगपासून 167 किलोमीटर अंतरावर आले, जिथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता.

ट्विट

उत्तर कोरियाने यूएस आणि दक्षिण कोरियाला “इतिहासातील सर्वात भयंकर किंमत चुकवावी” लावण्यासाठी अण्वस्त्रे वापरण्याची गुप्त धमकी दिल्याच्या काही तासांनंतर क्षेपणास्त्रांचा हा मारा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाने दिलेल्या स्पष्टीकरणात युक्तीवाद केला आहे की, ते त्यांच्या नव्याने निर्मिती झालेल्या शस्त्रांची चाचणी आणि युद्धसराव करत होते. त्यांनी याबाबत सियोल प्रशासन आणि लष्कराला माहितीही दिली होती. आपल्या युद्धसरावात सुमारे 240 युद्धविमानांचा समावेश असल्याचेही सियोल लष्कराला कळविण्यात आल्याचे स्पष्टीकरण उत्तर कोरियाने दिले आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियाने स्पष्ट भूमिका घेत म्हटले आहे की, यापुढे उत्तर कोरियाचा लष्करी उतावळेपणा आणि चिथावणीखोरपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही.