![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/06/Air-India-784x441-380x214.jpg)
चीन मधील वुहान (Wuhan) शहरापासून लागण झालेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभुमीवर नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच स्थानिक सरकारकडून सुद्धा कोरोना व्हायरसमुळे संभाव्य पावले उचलली जात आहे. देशात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्व उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. तर एअर इंडिया यांनी रोम, मिलान आणि सिओल येथील उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये 827 तर इराणमध्ये 354 लोकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
कंपनीने याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, रोम (इटली) येथील सेवा 15 ते 25 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. तर मिलान आणि साउथ कोरियाची राजधानीसाठीची उड्डाणे 14 ते 28 मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ऐवढेच नाही तर सरकारकडून पर्यटन व्हिजा 15 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे सांगितले आहे की, केरळ येथे कोरोनाचे 8, दिल्लीत आणि राजस्थान येथे अनुक्रमे 1-1 नवी प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीत कोरोनाची पॉझिटिव्ह 5 रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशात 9 जण असून बुधावार पर्यंतची ही आकडेवारी आहे.(Coronavirus Outbreak: अमेरिकेमध्ये युरोपातून येणार्या प्रवाशांना पुढील 30 दिवसांसाठी बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती)
आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, विमानतळावर आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा वाढते जाळे पाहता भारताने मंगळवारी फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन येथील नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या ई-व्हिजाला स्थगिती देण्यात आली आहे. याच दरम्यान, ओसीआय कार्ड होल्डर यांना देण्यात आलेली व्हिजा फ्री ट्रॅव्हल सुविधा सुद्धा 15 एप्रिल प्रर्यंत बंद करण्यात आली आहे.