कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता जागतिक आरोग्य संघटनेने आता त्याला जागतिक आरोग्य संकट म्हणून ओळखले जाते. दरम्यान त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून 15 एप्रिल पर्यंत टुरिस्ट व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तर अमेरिकेमध्येही युरोपातून येणार्या प्रवाशांवर पुढील 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती देताना शुक्रवार (13 मार्च) पासून ही बंदी लागू करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. दरम्यान सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1135 वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 38 आहे. अमेरिकेत अनेक विद्यापीठांमध्ये नियमित क्लास रद्द करून ऑनलाईन ट्युशन सुरू करण्यात आले आहेत. Coronavirus: COVID-19 विषाणू म्हणजे साथीचा आजार- जागतिक आरोग्य संघटना.
डॉनल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्वीटनुसार, कोरोना व्हायरस हा सध्या जगाचा समान शत्रू आहे. दरम्यान त्याच्याशी सामना करणं ही आपली प्राथमिकता असेल. अमेरिकेच्या रहिवाशांना सुरक्षित ठेवणं याला प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्येही इमरजंसी जाहीर करण्यात आली आहे. तर यामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1000 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणं टाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
डॉनल्ड ट्र्म्प ट्वीट
The Media should view this as a time of unity and strength. We have a common enemy, actually, an enemy of the World, the CoronaVirus. We must beat it as quickly and safely as possible. There is nothing more important to me than the life & safety of the United States!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 11, 2020
दरम्यान भारतामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील एका बैठकीमध्ये 15 एप्रिलपर्यंत राजनैतिक, सरकारी, युएन आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था तसेच रोजगार आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून इतर सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 60 वर पोहचली आहे.