कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजे एक विशिष्ट प्रदेश किंवा खंडप्राय देशांमध्ये उद्भवणारा साथीचा आजार (Pandemic) असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) महासचिवांनी याबाबत माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना व्हायरसचे अधिकृत नाव हे COVID-19 असे ठेवले आहे. या विषाणूचे उगमस्थान चीनमधील हुआन या शहरात आढळले आहे. या आजाराने आतापर्यंत जगभरात 3000 नागरिकांचा बळी घेतला आहे. तर जगभरातील हजारो नागरिक या आजाराने संक्रमीत झाले आहेत.
COVID-19 विषाणुच्या विळख्यात आता भारतही आला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना व्हायरस म्हणजेच COVID-19 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 60 इतकी असल्याचे भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन पहीला व्यक्ती दगावण्याची घटना स्वीडन येथे घडली. त्यानंतर जगभरातील विविध देशांमध्ये या विषाणूची लागण होऊन हजारो नागरिक दगावले आहेत. एकट्या चीनमध्येच या रोगामुळे सुमारे 3000 पेक्षाही अधिक लोक दगावल्याचा दावा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी केला आहे.
महाराष्ट्रातही कोरोणा विषाणूची बाधा झाल्याचे 7 रुग्ण आढळले आहेत. यापैकी पाच पुण्यातील व 2 मुंबई येथे आढळले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज (बुधवार, 11 मार्च 2020) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 10, आवश्यकता असेल तरच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
एएनआय ट्विट
Director-General of the World Health Organization (WHO): We have made the assessment that #COVID19 can be characterized as a pandemic https://t.co/Sp19gLdORQ
— ANI (@ANI) March 11, 2020
कर्मचाऱ्यांना ' वर्क फ्रॉम होम' करू दया, पंकजा मुंडे यांची मागणी : Watch Video
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे यांनीही आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शक्य तितक्या सर्व नागरिकांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष विभाग सुरु करण्यात आले आहेत. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जाणार आहे.