कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेता जगातील अनेक कंपन्या कोविड-19 लस (COVID-19 Vaccine) तयार करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय अनेक देशांनी कोविड-19 लसीचे डोस घेण्याची तयारी सुरू आहे. परंतु, दुसरीकडे काही धार्मिक गटांनी बंदी घातलेल्या डुकराच्या मांसापासून बनवलेल्या उत्पादनांविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेसंदर्भात भीती व्यक्त केली जात आहे. लसींच्या साठवण आणि वाहतुकीदरम्यान त्यांची सुरक्षा आणि परिणामकारकता राखण्यासाठी डुकराच्या मांसापासून बनवलेल्या जिलेटिनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काही कंपन्यांनी डुकराचे मांस न वापरता लस तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे काम केले आहे. स्विस फार्मास्युटिकल कंपनी 'नोव्हार्टिस' ने डुकराचे मांस न वापरता मेंदुज्वरची लस तयार केली. तसेच सौदी आणि मलेशियाची कंपनी एजे फार्मासुद्धा अशीच लस बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, फायझर, मॉडर्न आणि अॅस्ट्रॅजेनेकाच्या प्रवक्त्यांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या कोविड-19 लसीमध्ये डुकराच्या मांसापासून बनविलेले पदार्थांचा वापर करण्यात आलेला नाही. परंतु, अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी त्यांच्या लसींमध्ये डुकराचे मांस असल्याचे स्पष्ट केलेले नाही. अशा परिस्थितीत इंडोनेशियासारख्या मोठ्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. (हेही वाचा - Italy मध्ये आढळला Britain मधील कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीच्या विषाणूची लागण झालेला रूग्ण
ब्रिटीश इस्लामिक मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस सलमान वकार यांचे म्हणणे आहे की, ‘ऑर्थोडॉक्स’ यहूदी आणि मुस्लिम यांच्यासह विविध धार्मिक समुदायांमध्ये लसींचा वापर करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. हा समूदाय डुकराच्या मांसापासून बनविलेले पदार्थ वापरणे धार्मिक दृष्टिकोनातून अपवित्र मानतो. (वाचा - Coronavirus in Britain: ब्रिटेन येथे कोरोनाच्या नव्या रुपाचे थैमान, विमानसेवा तात्पुरती स्थगित)
सिडनी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरनूर रशीद म्हणतात, लसीमध्ये जिलेटिनच्या वापरासंदर्भात झालेल्या विविध चर्चेत आतापर्यंत एकमत झाले असून, ते इस्लामिक कायद्यानुसार मान्य आहे. कारण जर लसीचा वापर केला नाही, तर बरेच नुकसान होण्याची शक्यता आहे.