Italy मध्ये आढळला Britain मधील कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीच्या विषाणूची लागण झालेला रूग्ण
Virus | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

इटलीमध्ये (Italy) ब्रिटनप्रमाणेच (Britain कोरोना वायरसच्या नव्या स्ट्रेनची (New Strain of Coronavirus) लागण  झालेला एक रूग्ण आढळला आहे. काल (20 डिसेंबर) इटलीच्या आरोग्य मंत्रालयाकडून त्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान रूग्ण आणि तिचा साथीदार काही दिवसांपूर्वी युकेवरून (UK) परतला होता. सध्या तो रोम (Rome) मध्ये असून आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे.

नाताळच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लंडनमध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. सध्या ब्रिटनमध्ये काही भागात लेव्हल 4 चा लॉकडाऊन आहे. लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी आहे. ब्रिटनच्या आजूबाजुच्या देशांनी देखील आता दक्ष राहत पर्यटकांना वेशीवरच रोखण्याचा निर्णय घेतला आहे. काही राष्ट्रांनी युके मधून येणारी विमानसेवा रोखली आहे. Coronavirus in Britain: ब्रिटेन येथे कोरोनाच्या नव्या रुपाचे थैमान, विमानसेवा तात्पुरती स्थगित.

सध्या युनायटेड किंग्डम मध्ये कोरोना वायरसचा फैलाव झपाट्याने होण्यामागे या नव्या प्रजातीच्या विषाणूचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने आता तेथील आरोग्य यंत्रणा पावलं उचलत आहेत. जगात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोविड 19 लसीकरणाला सुरूवात करणारा पहिला देश देखील युकेच आहे. काही आठवड्यांपूर्वी युके मध्ये अमेरिकेच्या फायझर कंपनीच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी आणि वयोवृद्ध लोकं ही लसीकरणासाठी प्राधान्य असल्याचं सांगितलं जात आहे.

युके  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साऊथ इस्ट इंग्लंड मध्ये हा नव्या प्रजातीचा कोरोना वायरस झपाट्याने पसरत आहे.  हा अंदाजे 70% अधिक झपाट्याने पसरत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.