PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इटली आणि इंग्लंडलच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आज (शुक्रवार- 29 ऑक्टोबर) रवाना झाले आहेत. पंतप्रधान सर्वप्रथम इटलीची राजधानी रोम येथे G-20 शिखर परिषदेत (16th G-20 Summit) सहभागी होतील. इथे ते G-20 नेत्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यानंतर पंतप्रधान इंग्लंडलमध्ये ग्लास्गो येथे जातील. तेथे ते जलवायू संदर्भात आयोजित COP-26 वर्ल्ड लीडर समिटमध्ये सहभागी होतील. इटली दौऱ्यात पंतप्रधान वेटीकन सिटी येथे पोप फ्रान्सीस यांच्याशीही चर्चा करतील.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी म्हटले की, 'रोम (इटली) दोऱ्यादरम्यान जागतिक अर्थव्यवस्था, महामारीपासून आरोग्याचा बचाव आणि हवामान बदल (Climate Change) या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जी-20 मधील इतर नेत्यांची भेट घेईन'. पुढे बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, 'सीओपी-26 मध्ये ‘कार्बन स्पेस'च्या समान वाटपासाठी हवामान बदलाच्या मुद्द्यावर व्यापक प्रामाणावर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्लासगो येथील सीओपी-26 उच्चस्तरीय खंडामध्ये जलवायू कारवाईवर भारताच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि आमच्या कामगिरीबद्दल माहिती दिली जाईल.' (हेही वाचा, G-20 Summit in Japan: जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ईरान, 5 जी, सुरक्षा, द्वपक्षीय संबंध आदी मुद्द्यांवर चर्चा)

पंतप्रधानांचा दौरा, नियोजित कार्यक्रम

29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर- रोम आणि ग्लासो दौरा

29 ते 31 ऑक्टोबर- जी-20 देशांच्या शिखर परिषदेत सहभाग (इटली), त्यानंतर सीओपी-26 परिषदेसाठी जागतिक नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इंग्लंडमधील ग्लासगो येथे रवाना होतील.

ट्विट

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी गुरुवारी म्हटले की, इटलीमध्ये जी-20 शिखर परिषदेत कोविड-19 महामारी विरोधात तसेच, भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य प्रश्न आणि आव्हानांबात ठोस पावले उचलण्यावर चर्चा होऊ शकते. परराष्ट्र सचिवांनी असेही सांगितले की, भारत पॅरीस करारानुसार निश्चित ध्येय पूर्ण करण्यासाठी विकसनशिल देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत करण्यासाठी विविध आर्थिक संसाधने आणि तंत्रज्ञान उपलब्द करुन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.

जी-20 शिखर परिषदेत आणि सीओपी-26 मझ्ए सहभाही होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुक्रमे रोम आणि ग्लासगो दौऱ्याबाबत परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, 'आम्ही आपली एनडीसी कटीबद्दता पूर्ण करण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठीच्या मार्गावर आहोत.'