PM Narendra Modi, Donald Trump | (Photo Credits: Twitter/ANI)

G-20 Summit 2019 in Japan: जी 20 शिखर परिषद जपान (Japan) देशातील ओसाका (Osaka) शहरात सुरु झाली आहे. या परिषदेदरम्यन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात भेट आणि काही मुद्द्यांवर बऱ्यापैकी विस्ताराने चर्चा झाली. या भेटीदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना लोकसभा निवडणूक 2019 मधिल विजयाबाबत शुभेच्छा दिल्या. तसेच, भारत आणि अमेरिका संबंधांवरील काही मुद्द्यांवरही या वेळी चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांची भेट जपानचे पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यासोबतही झाली. दरमयान, या परिषदेत भारत अमेरिका यांच्यात ईरान, 5 जी, सुरक्षा, द्वपक्षीय संबंध आदी मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, मोदी-ट्रम्प यांच्यातील भेटीदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना म्हटले की, 'आपल्याला सार्वत्रिक निवडणुकीती यशाबाबत शुभेच्छा. आपण विजयासाठी योग्य आहात आणि आपले कामही दमदारपणे चालले आहे. मला आजही आठवते जेव्हा आपण पहिल्यांदा (2014) निवडणुक लढवत होता. तेव्हा अनेक राजकीय पक्ष आपापसात लढत होते. या वेळी ते सर्व विरोधी राजकीय पक्ष एकत्र आले होते. हीच आपल्या ताकदीची ओळख आहे.'

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, 'भारतासोबतचे संबंध चांगले झाले आहेत. आम्ही भारतासोबतची अमेरिकेची दोस्ती नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कठीबद्ध आहोत. मी आणि पंतप्रधान मोदी हे चांगले मित्र झालो आहोत. दोन्ही देश या आधी कधीच एकमेकांच्या जवळ नव्हते. आम्ही मिलिट्रीसह अन्य क्षेत्रांतही सोबत काम करु. इथे आमची भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी चर्चा होईल.' (हेही वाचा, सामंत गोयल RAW Chief तर अरविंद कुमार Intelligence Bureau चे नवे संचालक)3

एएनआय ट्विट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानत म्हटले की, 'लोकशाही आणि शांततेसाठी आम्ही कठीबद्ध आहोत. सबका साथ-सबका विकास हा आमचा विचार आहे. आम्ही मेक इन इंडिया या मंत्राने पुढे जात आहोत. भारताप्रती प्रेम व्यक्त केल्याबद्धल आभारी आहे.' दरम्यान, या वेळी दोन्ही देशांमध्ये चार मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ज्यात ईरान, 5 जी, सुरक्षा, द्वपक्षीय संबंध आदी मुद्द्यांचाही समावेश आहे.