सामंत गोयल RAW Chief तर अरविंद कुमार Intelligence Bureau चे नवे संचालक
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तान विरोधात उरीचा सर्जिकल स्ट्राईक, बालकोट येथील दुसरा सर्जिकल स्ट्राईक या हल्ल्यातील स्ट्रॅटिजिस्टपैकी एक सामंत गोयल  (Samant Goel) यांची RAW च्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली तर अरविंद कुमार (Arvind Kumar) यांच्यावर IB च्या संचालकपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षपदाखालील समितीने सामंत गोयल आणि अरविंद कुमार यांची निवड केली आहे. अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. तर सामंत गोयल हे 1984 बॅचचे आयपीएस अध्यक्ष आहेत. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

रॉ' ही संस्था शत्रू राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे. पराराष्ट्रांप्रमाणे देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्याचं काम आय बी करते.