Surgical Strike 2: 14 फेब्रुवारीच्या दुपारी जैश ए मोहम्मद(Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेने भारताच्या सीआरपीएफ जवानांच्या बस ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान ठार झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack) केवळ भारतामध्ये नव्हेच जागतिक स्तरावर त्याचे पडसाद उमटले. भारतीय जवानांवरील हल्ल्याचा आता भारताने बदला घेतला आहे. आज भारताने सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आला आणि जैश ए मोहम्मदचे कॅम्प उडवण्यात आलं आहे.
सर्जिकल स्ट्राईक 2 चा घटनाक्रम
- 14 फेब्रुवारीच्या दुपारी 3.30च्या दरम्यान भारतीय सीआरपीएफ जवानांच्या बसवर स्फोटकांचा ट्रक घेऊन जाऊन हल्ला करण्यात आला.
- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे भारतासह जागतिक स्तरावर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला.
- भारताला पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी देखील पुलवामा दहशतवादी हल्ला भयावह असल्याचं म्हटलं आहे.
- नरेंद्र मोदी यांनी बलिदान वाया जाणार असं सांगत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला योग्य वेळी घेतला जाईल असं सांगण्यात आले होते.
- 26 फेब्रुवारीच्या पहाटे 3.30 वाजता भारताने 12 मिराज विमानं पाकव्याप्त काश्मिर मध्ये गेली.
- अवघ्या काही सेकंदामध्ये POK भागामधील चार ठिकाणी एअर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये बालाकोट, ही ठिकाणं उडवण्यात आली.
BREAKING: Pakistani JF17 immediate retaliate back to Indian Air Force volition at Line of Control.
Pakistan Retaliate Karne Ka Soche Ga Nahi, Pakistan Retaliate Karega!! #PMIK pic.twitter.com/37OSr3e3a0
— Arsalan Siddiqy (@ArsalanISF) February 26, 2019
- POK पासून सुमारे 88 ते 100 किमी आत जाऊन भारतीय वायुसेनेने जैश ए मोहम्मद या संघटनेचे कॅम्प, कंट्रोलरूम उडवण्यात आले. यामध्ये 1000 किलोबॉम्ब हल्ला करण्यात आला.21 मिनिटं हा हल्ला करण्यात आला आणि यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले.
- वायुसेनेची विमानं हल्ला करून भारतामध्ये सुरक्षितपणे परत आली आहेत.
- पाकिस्तानकडून भारताने LOC चे उल्लंघन झाल्याचे गफूर यांनी ट्विट केले आहे.
- भारताने कारवाईची घोषणा करण्यापूर्वीच पाकिस्तानने या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
- भारताचे एअर स्ट्राईक पूर्ण झाल्यनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा होती. सैनिकांचे जीव धोक्यात न घालता एअर स्ट्राईकद्वारा सुरक्षितपणे हल्ला करण्याचा प्रयत्न नक्कीच भारतीय वायुसेनेचं मोठं यश आहे.