Flight प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit- X)

Malaysia Airlines Flight: सुमारे 10 वर्षे आणि 239 प्रवाशांसह बेपत्ता असलेल्या प्रवासी विमानाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. आजपर्यंत विमानाचा कोणताही अवशेष सापडला नाही किंवा त्यातील प्रवाशांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता एका अमेरिकन कंपनीने या बेपत्ता विमानाचा शोध (Search for Missing Plane) घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'MH370' या विमानाचा शोध पुन्हा सुरू करण्याचा अमेरिकन कंपनीचा 'नो फाईंड, नो फी' (No Find, No Fee) प्रस्ताव मलेशिया सरकारने (Malaysian Government) तत्त्वतः मान्य केला आहे.

MH370 विमान 10 वर्षांपूर्वी बेपत्ता -

परिवहन मंत्री अँथनी लॉके यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. MH370 हे विमान सुमारे 10 वर्षांपूर्वी दक्षिण हिंदी महासागरात क्रॅश झाले होते. लॉके यांनी सांगितले की, कॅबिनेट मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बैठकीत टेक्सास कंपनी 'ओशन इन्फिनिटी'ला समुद्रातील 15,000 चौरस किलोमीटरच्या नवीन जागेवर शोध सुरू ठेवण्याची परवानगी दिली. ओशन इन्फिनिटीद्वारे ओळखले जाणारे प्रस्तावित नवीन अन्वेषण क्षेत्र तज्ञ आणि संशोधकांकडून नवीनतम डेटा विश्लेषणावर आधारित आहेत, असं त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा -Hyderabad-Kuala Lumpur Flight Emergency Landing: हैदराबादहून क्वालालंपूरला जाणाऱ्या मलेशियन एअरलाइन्सच्या इंजिनला आग; विमानाचे राजीव गांधी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग (Watch Video))

बेपत्ता विमानात 239 प्रवासी -

2014 मध्ये प्रवासी विमान बेपत्ता झाले होते. 8 मार्च 2014 रोजी बोईंग 777 विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात 239 प्रवाशी होते, त्यापैकी बहुतांश चिनी नागरिक होते. हे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बीजिंगला गेले होते.

बेपत्ता विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या भावना -

MH370 इनफ्लाइट सुपरवायझर पॅट्रिक गोम्स यांच्या पत्नी जॅकीटा गोन्झालेस यांनी न्यू स्ट्रेट्स टाईम्सला सांगितले की, मला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे. यंदाचा ख्रिसमस माझ्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. तथापी, जियांग हुई यांची आई या विमानत होती. त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, मलेशिया सरकारने शोधासाठी अधिक खुला दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. फ्लाइट MH370 ने 8 मार्च 2014 च्या पहाटे क्वालालंपूर येथून उड्डाण केले. उड्डाणानंतर एका तासापेक्षा कमी वेळात त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला होता. हे विमान त्याच्या नियोजित उड्डाण मार्गापासून दूर गेले होते.