Malaysia Airlines engine on fire from Hyderabad to Kuala Lumpur Airplane (PC -X/@yauvani_1)

Hyderabad-Kuala Lumpur Flight Emergency Landing: हैदराबादहून क्वालालंपूरला (Hyderabad-Kuala Lumpur Flight) जाणाऱ्या मलेशियन एअरलाइन्स (Malaysian Airlines) च्या विमानाचे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गुरुवारी, 20 जून 2024 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Rajiv Gandhi International Airport) आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या फ्लाइटमध्ये 100 हून अधिक प्रवाशी होते. विमानाला हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

IANS च्या वृत्तानुसार, हवेत इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर विमान पहाटे परतले. MAS 199 फ्लाइटने 138 जणांसह 12.30 वाजता उड्डाण केले. वैमानिकाने हवेत आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) कडे परतण्यासाठी परवानगी मागितली आणि पहाटे 3.58 च्या सुमारास विमानाने सुरक्षित लँडिंग केले. (हेही वाचा -Mumbai Airport: थरार! एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांची धडक होताहोता राहिली; मुंबई विमानतळावरील काळजाचा ठोका चुकवणारी दृश्ये (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानाच्या उजव्या इंजिनच्या बाजून आगीच्या थिणग्या निघताना दिसत आहेत. विमान निघाल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी ही आग लागली. पायलटने प्रवासी शांत राहतील याची खात्री करत आपत्कालीन लँडिंग सुरू करण्यासाठी परवानगी मागितली.