Mumbai Airport: मुंबई विमानतळावर विमानांच्या लॅंडिंग आणि टेकऑफचा थरार घडल्याचा व्हिडीओ समोर आला. ज्यात एकाच धावपट्टीवरून एअर इंडिया(Air India)चे विमान 320 टेक ऑफ करताना इंडिगो(IndiGo)चे 6E 6053 विमान धोकादायक लॅंडिंग करताना दिसले. इंडिगोच्या पायलटने घेतलेल्या या रिस्की लॅंडिंगमुळे अनेकांच्या बुवया उंचावल्या आहेत. व्हिडिओमध्ये, एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून निघाल्यानंतर काही मिनिटांत इंडिगोचे विमान खाली उतरताना दिसले. दरम्यान, ही घटना मुंबई विमानतळाच्या ATC कडून विमानाच्या लॅँडिंग दरम्यान मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे घडली. ज्यात कारवाई करत डीजीसीएकडून दोषी एटीसी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. (हेही वाचा:Mumbai Airport Closed for 6 Hours: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या ६ तास बंद, नेमक कारण काय? )
पोस्ट पाहा-
Woh, this looks real close.@IndiGo6E lands just when @AirIndia was taking-off at Mumbai Airport.@DGCAIndia @FAANews @CSMIA_Official @MoCA_GoI pic.twitter.com/wRtFiTLKHE
— Tarun Shukla (@shukla_tarun) June 9, 2024
DGCA has derostered the ATC staff involved in the incident at Mumbai Airport where an inbound IndiGo flight landing on Runway 27 while an Air India flight was still in the process of taking off: DGCA
— ANI (@ANI) June 9, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी मुंबई विमानतळावर घडली. ज्यात एअर इंडियाचे विमान टेक ऑफच्या तयारीत असताना इंडिगोच्या विमानाने मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे रनवे 27 वर लँडिंग केले होते. दरम्यान, या घटनेत पायलच्या तप्तरतेमुळे अनेकांचा जीव बचावला. अन्यथा मोठी दुर्घटना ही अटळ होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)