जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांच्या हस्तलिखीत नोट्सचा (Isaac Newton Handwritten Notes) लंडन (London) येथे लिलाव होणार आहे. हे हस्तलिखीत सुमारे 334 वर्षे जुने आहे. दावा केला जात आहे की, या हस्तलिखीतावरुन लक्षात येते की आयझॅक न्यूटन ((Isaac Newton) यांच्या डोक्यामध्ये तेव्हा नेमके काय सुरु होते. या हस्तलिखीताचा लिलावकर्ता क्रिस्टीज यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, आयझॅक न्यूटन यांनी 'प्रिन्सिपीया' (Principia’) बाबत केलेले आपले कार्य या हस्तलिखीतात थोडक्यात उतरवले आहे.
Principia’ किंवा फिलासफी नेचुरालिस प्रिंसिपिया मैथेमैटिका (Philosophy Naturalis Principia Mathematica) मध्ये गुरुत्वाकर्शनाचा आणि वेगाच्या सिद्धांताचे वर्णन आहे. 1987 मध्ये छापलेले हे पुस्तक लॅटीन भाषेत आहे. हे पुस्तक एकूण तिन भागात विभागलेले आहे. या पुस्तकात न्यूटनच्या गतीविषयक नियम, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि केप्लरच्या ग्रहीय गती नियमांच्या उत्पत्तीबद्दल सांगण्यात आले आहे. प्रिन्सीपीया हे विज्ञाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पुस्तक मानले जाते.
आयझॅक न्यूटन यांच्या पुस्तकाच्या पहिल्या अवृत्तीचा लिलाव 2016 मध्ये झाला होता. त्या वेळी 37 लाख डॉलरची बोली लागली होती. लंडनमध्ये क्रिस्टीज पुस्तक आणि हस्तलिखित कागदपत्रांचे प्रमुख थॉमस वेनिंग यांनी म्हटले आहे की, पुस्तक ब्रह्मांडच्या बाबत आमच्या माहितीला आधार देईल. लेखांच्या अर्थ्या भागातून याचा पुढचा भाग काढण्याचा विचार आहे. यात स्कॉटलँडचे गणितज्ज्ञ आणि खगोल विज्ञांनी डेव्हीड ग्रेगरी यांच्या टीपणांचा आणि आकृतींचा समावेश आहे. न्यूटन 1690 च्या दशकात जेव्हा ‘प्रिंसिपिया’ वर काम करत होते तेव्हा दोन्ही वैज्ञानिकांची मुलाखथ झाली होती.