Weather Update : राज्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला, तर कुठे कडाक्याच्या ऊनामुळे नागरिकांच्या जिवाची काहीली होत आहे. दिवसभर उन्हाचा चटका सोसल्यानंतर संध्याकाळी वातावरणात पुन्हा गारवा असल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे उन्हाळा अगदी सुरु झाला असताना देशाच्या उत्तरेकडील राज्यात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या 11 ते 14 मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा :Weather Update: थंडी गायब! महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज )
पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये 10 ते 12मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे. या एकूण परिस्थीतीचा परिणाम राज्याच्या वातावरणावर देखील होणार आहे. विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. (हेही वाचा : Maharashtra Weather Update: ऐन दिवाळीत राज्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट, या भागात पावसाची शक्यता)
स्कायमेटच्या अंदाजानुसार, आज जम्मू आणि काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव अपेक्षित आहे. दरम्यान, 12 ते 14 मार्चपर्यंत पंजाबच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्याचवेळी 13 आणि 14 मार्च रोजी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो. 11 ते 14 मार्च दरम्यान, जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान आणि हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय 11 ते 14 मार्च दरम्यान उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो.
एकामागून एक असे दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज आहे. त्याचा परिणाम उत्तर पश्चिम भारत आणि पश्चिम हिमालयावर होण्याची शक्यता आहे. पहिल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 10 मार्चच्या रात्रीपासून तर दुसऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 12 मार्चच्या रात्रीपासून दिसून येईल. याशिवाय तेलंगणा आणि आजूबाजूच्या परिसरात चक्री वाऱ्यांचे क्षेत्र कायम आहे. यामुळेच पाऊस पडत आहे.