Weather Update: थंडी गायब! महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Weather Update:  देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत पावसाने हैराण केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात पुढील काही तास पाऊस असणार आहे. सोबत पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात काल रात्री ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपीठा पडला,  त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे भरपूर नुकसान झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस असणार आहे. या ठिकाणी जोरदार ते रिमझिम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. कोकण विभागासह, कोल्हापूर, सातारा,अहमनगर, वाशिम येथे पावसाची शक्यता आहे.  मुंबई आणि दिल्ली शहरात पाऊस पडू शकतो. 28 नोव्हेंबरला उत्तराखंमध्ये पाऊस पडू शकतो. छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. काल रात्री महाराष्ट्रात मराठवाड्यात जोरदार पाऊस होता. काही ठिकाणी आज ही मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सोबत वीजगर्जानेसह पाऊस असणार आहे.

किन्नौर, लाहौल- स्पीती, कुल्लू आणि शिमला या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेशात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. 28, 29 नोव्हेंबर पर्यंत बर्फवृषी कमी होईस आणि हवामा स्वच्छ राहील.