Maharashtra Weather Update: राज्यात काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहे. त्यामुळे अनेक भागात प्रदुषणाला देखील सामाना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज ९ नोव्हेंबर रोजी पावासाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. फक्त महाराष्ट्रत नव्हे तर देशातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे.
राज्यात बुधवारी काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर या जिह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात रिमझिम पाऊस असणार आहे.
8 नोव्हेंबर, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार दक्षिण #कोकण भागांसह दक्षिण #मध्यमहाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २,३ दिवस या भागात अंशत: ढगाळ आकाश कायम राहील. pic.twitter.com/1ET7xoD4qG
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 8, 2023
आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवस राज्यात ढगाल वातावरण असेल. ऐन दिवाळीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होते आहे. त्यामुळे बळीराजा संटाळाच्या तावडीत सापडला आहे. कोकणात बुधवारी पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले, राज्यातील इतर भागांत हिवाळ्यातील खरीप पिकांसाठी पाऊस नुकसानदायक ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे कांद्याच्या पिकाचं नुकसन केले. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.