Kulbhushan Jadhav | (Photo Credits: IANS)

India vs Pakistan, Kulbhushan Jadhav case verdict: कुलभूषण जाधव खटल्यात वादी-प्रतिवादी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज (17 जुलै 2019) आंतरराष्ट्रीय न्यायालय ( International Court of Justice) आपला अंतिम निर्णय देणार आहे. या खटल्यात एकूण 16 न्यायाधीशांचे खंडपीठ मिळून निर्णय देणार आहे. या खटल्यात ICJ चे मुख्य न्यायाधीश अब्दुलकावि अहमद युसूफ (Abdulqawi Ahmed Yusuf) हे या खंडपीठाचे नेतृत्व करत आहेत. भारत आणि पाकिस्तान उभय देशांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि तितक्याच हायहोल्टेज ठरलेल्या या खटल्यात कोणकोणते न्यायाधीश असणार आहेत याबाबत घ्या जाणून.

अब्दुलकावि अहमद युसूफ (सोमालिया)

कुलभूषण जाधव खटल्यात निवाडा करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या 16 न्यायाधीशांच्या बेंचचे अब्दुलकावि अहमद हे प्रमुख आहेत. अब्दुलकावि अहमद युसूफ हे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश ऑफ कोर्ट चे प्रमुख आहेत. 2018 पासून ते या पदावर नियुक्त आहेत. या आधी ते तीन वर्षे ICJ चे उपाध्यक्षही राहिले आहेत. तसेच, ते UNESCO चे कायदेशीर सल्लागारही राहिले आहेत.

दरम्यान, 16 न्यायाधीशांच्या या बेंचमध्ये एका भारतीय आणि एका पाकिस्तानी न्यायाधीशाचाही समावेश आहे. दलवीर भंडारी असे भारतीय न्यायाधीशाचे नाव आहे. दलवीर भंडारी हे 2012 पासून आंतरराष्ट्रीय कोर्टात जज आहेत. तर, तस्सदुक हुसैन जिलानी असे पाकिस्तानी न्यायाधीशांचे नाव आहे. परंतू, जिलानी हे आंतरराष्ट्रीय कोर्टाचे कायमस्वरुपी घटक नाहीत. त्यांची नियुक्ती ही एंट्री एडडॉक जजच्या धरतीवर झाली आहे. जर एखादा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टात आला आणि त्या खटल्यात वादी प्रतिवादी असलेल्या देशाचा प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय कोर्टात नसेल तर, अशा वेळी एंट्री एडहॉक जज म्हणून त्या देशाला संधी दिली जाते. (हेही वाचा, भारत विरुद्ध पाकिस्तान: कुलभूषण जाधव खटल्याचे Live Streaming इथे पाहा)

कुलभूषण जाधव प्रकरणात निर्णय देणारे न्यायाधीश मंडळ

  • अब्दुलकावि अहमद युसूफ, ICJ मुख्य न्यायाधीश (सोमालिया)
  • शू हांकिन, ICJ उपाध्यक्ष (चीन)
  • न्यायाधीश मोहम्मद बेनौना (मोरक्को)
  • न्यायाधीश एंटोनियो ऑगस्टो ट्रिनडाडे (ब्राजील)
  • न्यायाधीश पीटर टॉमका (स्लोवाकिया)
  • न्यायाधीश यूजी इवसावा (जापान)
  • न्यायाधीश पैट्रिक लिप्टन रॉबिनसन (जमैका)
  • न्यायाधीश जेम्ल रिचर्ड क्रॉफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
  • न्यायाधीश जूलिया सेबुटिंडे (यूगांडा)
  • न्यायाधीश किरिल गेवोर्जिअन (रशियन फेडरेशन)
  • न्यायाधीश नवाज सलाम (लेबनान)

कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवाद अशा दोन्ही आरोपाखाली त्यांना बलूचिस्तान येथे अटक केले. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील मिलिटरी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. पाकिस्तानच्या या भूमिकेविरुद्ध भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.